Vijay Merchant Trophy: पहिल्या डावातील मोठ्या आघाडीमुळे बंगालचे गोव्यावर पूर्ण वर्चस्व

Goa vs Bengal U16: बंगालने गोव्याविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यात यश मिळवले आहे.
Cricket | Bat-Ball
Cricket | Bat-Ball

Vijay Merchant Trophy, Goa vs Bengal U16, Day 2 Result:

विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (12 डिसेंबर) बंगालने गोव्यावर पूर्ण वर्चस्व राखले. पहिल्या डावात २७८ धावांची आघाडी घेतल्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी त्यांना विजयाची संधी आहे.

सुरत येथील सी. के. पिठावाला स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बंगालने 6 बाद 269 धावांवरून पहिल्या डावात 391 धावा केल्या. त्यांच्या अभिपराय बिश्वास याने शतक ठोकताना 218 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 129 धावा केल्या.

नंतर अवघ्या 8 धावांत 6 गडी बाद केलेल्या सचिन यादव याच्यासमोर नांगी टाकल्यामुळे गोव्याचा पहिला डाव 113 धावांत संपुष्टात आला. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावातही गोव्याला सुरवातीसच धक्का बसला. स्वप्नेश नाईक शून्यावर बाद झाला.

Cricket | Bat-Ball
Vijay Merchant Trophy: गोव्याची मजबूत पकड नंतर ढिली

संक्षिप्त धावफलक

बंगाल, पहिला डाव (6 बाद 269 वरून) : 127 षटकांत सर्वबाद 391 (अभिपराय बिश्वास 129, अव्रदीप बिश्वास 31, धनविन निमावत 21, सचिन यादव नाबाद 13, समर्थ राणे 24-6-71-3, शमिक कामत 17-1-37-1, चिगुरुपती व्यंकट 11-2-39-0, संचित नाईक 21-1-69-2, द्विज पालयेकर 34-6-89-0, ओम खांडोळकर 8-0-40-1, आराध्य गोयल 12-1-40-1).

गोवा, पहिला डाव: 53.2 षटकांत सर्वबाद 113 (आराध्य गोयल 0, स्वप्नेश नाईक 17, शुधित गुरव 3, प्रद्युम्न अटपडकर 26, चिगुरुपती व्यंकट 10, साई नाईक 16, शमिक कामत 4, द्विज पालयेकर नाबाद 16, समर्थ राणे 15, संचित नाईक 0, ओम खांडोळकर 0, शिवम भारती 18-2, अव्रदीप बिश्वास 36-2, सचिन यादव 12.2-7-8-6) व दुसरा डाव : 2 षटकांत 1 बाद 0 (स्वप्नेश नाईक 0, शुधित गुरव नाबाद 0, द्विज पालयेकर नाबाद 0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com