Tokyo Olympics: स्पर्धेत कोरोनाचा धोका आणखी गडद, 9 जणांना कोरोनाची लागण

ऑलिंपिकशी निगडीत असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या आता 58 झाली आहे, ऑलिंपिक (Olympics) क्रीडा ग्राममधील दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघातील दोन खेळाडू देखील कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
ऑलिंपिकशी निगडीत असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या आता 58 झाली आहे.
ऑलिंपिकशी निगडीत असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या आता 58 झाली आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

टोकियो: टोकियोमधील ओलंपिक गावामध्ये (Olympic Village) कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून, तेथे आणखीन 9 जणांना कोरोनाची (Covid19) लागण झाल्याचे समोर आले आहे. टोकियोतील ऑलिंपिक (Tokyo Olympics) आणि पैरालिंपिकच्या आयोजकांच्या सांगण्यानुसार, एका खेळाडूला आणि खेळाशी जोडलेले अन्य आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ऑलिंपिकशी निगडीत (Related to the Olympics) असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या आता 58 झाली आहे.

ऑलिंपिकशी निगडीत असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या आता 58 झाली आहे.
Tokyo Olympics: कोरोनाचे शुल्ककाष्ट हटेना,लिथुआनियाचा खेळाडू पॉझिटीव्ह

याआधी संयुक्त राज्य अमेरिकेतील एक महिला जिमनॅस्टीक खेळाडूने टोकियो ऑलिंपिक प्रशिक्षण शिबिरात कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे. टोकियो ऑलिंपिच्या उद्घाटना आधी खेळाडू चिबा प्रान्तातील इंजाई शहरात हे प्रशिक्षण घेत होते. ऑलिंपिक क्रीडा ग्राममधील दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघातील दोन खेळाडू देखील कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांची नावे जाहिर करण्यात आलेली नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com