Virat Kohli: किंग कोहली 'त्या'दिवशी ठोकणार विश्वविक्रमी 50 वे ODI शतक, गावसकरांची मोठी भविष्यवाणी

Sunil Gavaskar: विराट कोहलीच्या 50 व्या वनडे शतकाबद्दल सुनील गावसकरांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
Virat Kohli - Sunil Gavaskar
Virat Kohli - Sunil Gavaskar
Published on
Updated on

Sunil Gavaskar prediction on Virat Kohli 50th ODI Hundred:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघ तर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, पण भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील शानदार फॉर्ममध्ये आहे. तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सध्या सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. अशातच सुनील गावसकरांनी त्याच्या 50 व्या शतकाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

विराटचे सध्या वनडे कारकिर्दीत 48 शतके आहेत. तसेच तो सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 वनडे शतकाच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून अवघे एक शतक दूर आहे, तर 50 शतके पूर्ण करण्यासाठी त्याला 2 शतकांची गरज आहे. जर त्याने 50 शतके वनडेत ठोकली, तर तो असा कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरेल.

Virat Kohli - Sunil Gavaskar
World Cup 2023: वॉर्नरची शतक ठोकत सचिनशी बरोबरी, रोहितच्याही विश्वविक्रमाच्या पोहचला जवळ

दरम्यान, विराट त्याचे हे 50 वे वनडे शतक त्याच्या 35 व्या वाढदिवसाला म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ठोकेल, अशी आशा गावसकरांनी व्यक्त केली आहे.

भारताला 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाताला सामना खेळायचा आहे. त्याआधी भारताला 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध आणि 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे.

गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, 'कोहली त्याचे 50 वे वनडे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इडन गार्डन्सवर ठोकेल आणि त्याच्या वाढदिवसापेक्षा दुसरा चांगला दिवस यासाठी कोणता असेल? जेव्हा तो तिथे शतक ठोकेल, तेव्हा तो बघण्यासारखे दृश्य असेल. कारण कोलकाताचे प्रेक्षक स्टँडिंग ओवेशन देतील आणि चिअरही करतील. टाळ्यांच्या गजरात आणि शिट्ट्यांनी वातावर भारावून जाईल. हा क्षण कोणत्याही फलंदाजासाठी शानदार असेल.'

Virat Kohli - Sunil Gavaskar
KL Rahul: 'विराट, आपण सहज जिंकू, कर सेंच्यूरी...' म्हणत केएलने जिंकले कोट्यवधी चाहत्यांचे हृदय

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 वे शतक विराटला ठोकायचे असेल, तर त्याला त्याआधी इंग्लंड किंवा श्रीलंकेविरुद्ध 49 वे शतक ठोकावे लागेल.

खरंतर विराटला 22 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातच 49 वे वनडे शतक ठोकण्याची संधी होती. मात्र, तो भारताला विजयासाठी आणि त्याच्या शतकासाठीही अवघ्या 5 धावांची गरज असताना 95 धावांवर बाद झाला होता. हा सामना भारताने जिंकला होता.

विराटने या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत 5 सामन्याममध्ये एका शतकासह 354 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अव्वल क्रमांकावर 407 धावांवर क्विंटन डी कॉक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com