Shikhar Dhawan: 'गोष्ट जय-पराजयाची नाहीच...', टीम इंडियातून वगळल्यानंतर धवनची पोस्ट चर्चेत

शिखर धवनने केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanDainik Gomantak

Shikhar Dhawan: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील आगामी वनडे आणि टी20 मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या मालिकांसाठी सलामीवीर शिखर धवनला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याची एक भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला त्याने भावनिक कॅप्शन दिले होते. त्याने लिहिले होते की 'गोष्ट जिंकण्याची किंवा हरण्याची नाही, तर धैर्य महत्त्वाचे असते. आपण फक्त काम करत राहायचे, बाकी सर्व ईश्वरावर सोडून द्यायचे.' त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो नेट्समध्ये फलंदाजी सराव करताना दिसत होता.

Shikhar Dhawan
Team India: रिक्षाचालकाच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री! पाहा कशी आहे आजपर्यंतची कामगिरी

दरम्यान शिखरने ही पोस्ट काहीवेळातच डिलीट केली. मात्र, असे असले तरी त्याने ही पोस्ट डिलिट करण्यापूर्वी अनेक युजर्सच्या कमेंट्स आल्या होत्या. तसेच त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. अनेकांनी त्याने ही पोस्ट डिलीट का केली, असाही प्रश्न विचारला आहे.

धवनने यापूर्वीच कसोटी आणि टी20 संघातील त्याची जागा गमावली आहे. आता त्याला वनडे संघातूनही वगळले गेल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जवळपास संपुष्टात आल्याची चर्चा आहे.

त्याने 2022 वर्षात वनडेत खेळताना 22 सामन्यांत 34.40 सरासरीने 688 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या काही सामन्यांमध्ये शिखर धवनला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. तसेच ईशान किशनसह अन्य युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्याचमुळे शिखरला वनडे संघातूनही जागा गमवावी लागली असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

Shikhar Dhawan post
Shikhar Dhawan postDainik Gomantak

मात्र, वर्ल्डकप काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना शिखरला संघातून बाहेर केल्याबद्दल निवड समितीवर टीकाही होत आहे. दरम्यान, केवळ शिखरला वगळण्याचाच नाही, तर निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी निवडलेल्या भारतीय संघात अनेक बदल केले आहेत.

टी20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल अशा काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर मुकेश कुमार आणि शिवम मावी या नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी मिळाली आहे. तसेच टी20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आणि उपकर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे.

त्याचबरोबर वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम असले, तरी केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com