China Masters Super 750: चिराग-सात्विकने राखलं भारताचं आव्हान! आता खेळणार सेमीफायनल

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: चायना मास्टर्स स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू चिराग आणि सात्विकसाईराज यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
Satwiksairaj Rankireddy and Chirag ShettyX/BAI_Media
Published on
Updated on

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty enters into semifinal at China Masters Super 750 badminton tournament:

भारताची बॅडमिंटनमधील स्टार जोडी सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी शेनझेन येथे चालू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

सात्विक आणि चिराग यांनी शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत 13 व्या क्रमांकावरील इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नाडो आणि डॅनिएल मार्टिन यांना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. 46 मिनिटे चाललेल्या सामन्यांत भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला 21-16, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
World Badminton Championship: एचएस प्रणॉयला कांस्य पदक! 'ही' कामगिरी करणारा 5 वा भारतीय खेळाडू

सात्विक आणि चिरागसाठी हे वर्षही चांगले राहिले असून त्यांनी यावर्षी इंडोनेशिया 1000, कोरिया सुपर 500 आणि स्विस सुपर 300 या स्पर्धाही जिंकल्या आहेत. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

दरम्यान, चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आता सात्विक आणि चिराग यांचा सामना चीनच्या हे जी तिंग आणि रेन शांग यू या जोडीविरुद्ध होणार आहे.

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty
Asian Games: चिराग-सात्विक 'नंबर वन'! बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकत रचला इतिहास

असा झाला उपांत्यपूर्व सामना

सात्विक - चिराग आणि लिओ रॉली कार्नाडो - डॅनिएल मार्टिन यांनी पहिल्या गेममध्ये एकमेकांना कडवी झुंज दिली. ते 14-14 गुण मिळवत बरोबरीवर देखील होते. पण नंतर चिरागने काही चांगले शॉट्स खेळले. त्यामुळे भारतीय जोडीने आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत त्यांनी पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही चिराग आणि सात्विक यांनी मिळालेली लय कायम ठेवली. त्यांनी पहिल्या गेमच्या इंटरव्हलपर्यंत 11-6 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी 17-10 पर्यंत वाढवली आणि नंतर हा सामनाही आपल्या नावावर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com