AFG vs PAK: वयाच्या 21 व्या वर्षी 'या' खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकर अन् एमएस धोनीचा रेकॉर्ड!

Rahmanullah Gurbaz Record: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 59 धावांत गुंडाळल्यानंतर अफगाण संघाने 300 धावा केल्या.
Rahmanullah Gurbaz Record
Rahmanullah Gurbaz RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Rahmanullah Gurbaz Record: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानला 1 विकेटने पराभव पत्करावा लागला, परंतु पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर त्यांनी केलेले पुनरागमन खरोखरच कौतुकास्पद होते.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 59 धावांत गुंडाळल्यानंतर अफगाण संघाने 300 धावा केल्या. यामध्ये रहमानुल्ला गुरबाजने संघाला ही धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गुरबाजने 14 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 151 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला.

दरम्यान, वयाच्या 21 व्या वर्षी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंचा हा विक्रम आहे. अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) 23 वनडे खेळलेल्या गुरबाजचे 50 षटकांच्या फॉरमॅटमधील हे 5 वे शतक होते. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने यासह सचिनपेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.

मास्टर ब्लास्टरने वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, परंतु 21 व्या वर्षापर्यंत त्याला केवळ 4 शतके झळकावता आली.

या यादीत दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि श्रीलंकेचा उपुल थरंगा 6 शतकांसह अव्वल स्थानावर आहेत.

Rahmanullah Gurbaz Record
AFG vs PAK: वयाच्या 21 व्या वर्षी 'या' खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकर अन् एमएस धोनीचा रेकॉर्ड!

वयाच्या 21व्या वर्षी सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकणारे खेळाडू-

6 - क्विंटन डी कॉक

6 - उपुल थरंगा

5 - रहमानउल्ला गुरबाज

4 - सचिन तेंडुलकर

4 - इब्राहिम झद्रान

4 - शहरयार नफीस

4 - पॉल स्टर्लिंग

दुसरीकडे, या शतकासह पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) शतक झळकावणारा गुरबाज हा पहिला अफगाण खेळाडू ठरला. यासह त्याने धोनीचा एक मोठा विक्रमही मोडला. गुरबाजपूर्वी धोनीच्या नावावर पाकिस्तानविरुद्ध यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम होता.

2005 मध्ये माहीने मेन इन ग्रीन विरुद्ध 148 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती, पण आता गुरबाजने 151 धावांची खेळी खेळून हा विक्रम केला आहे.

Rahmanullah Gurbaz Record
AFG Vs PAK: अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने गमावली T20 सीरीज, शादाब म्हणाला- 'देशासाठी...'

तसेच, गुरबाजने 23 डावांत 5 शतके झळकावून बाबर आझमचा विक्रमही मोडीत काढला आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिली पाच शतके झळकावण्यासाठी 25 डाव घेतले.

परंतु गुरबाज बाबरला मागे टाकण्यासाठी त्याला दोन डाव कमी लागले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान 5 शतके क्विंटन डी कॉकने 19 डावात झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com