World Cup 2023: पथुम निसांकाची शानदार कामगिरी, गिलच्या विक्रमाशी केली बरोबरी

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 25 वा सामना 26 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरु येथे खेळला गेला.
Pathum Nissanka
Pathum NissankaDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 25 वा सामना 26 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरु येथे खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार कामगिरी करत स्पर्धेतील दुसरा विजय संपादन केला.

सामन्यादरम्यान सलामीवीर पथुम निसांकाने तूफानी फलंदाजी केली. डावाची सुरुवात करताना त्याने 83 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने 92.77 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक नाबाद 77 धावा ठोकल्या.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि दोन उत्कृष्ट षटकार आले. या सामन्यादरम्यान त्याने एक विशेष कामगिरीही केली. चालू वर्षात सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या बाबतीत त्याने शुभमन गिलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

खरे तर, इंग्लंडविरुद्ध (England) श्रीलंका सामन्यापूर्वी यावर्षी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम भारतीय फलंदाज शुभमन गिल (11) च्या नावावर होता. तर निसांका (10) बाबर आझमसोबत संयुक्त दुसऱ्या स्थानावर होता.

मात्र, आजच्या सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत गिलच्या विक्रमाशी बरोबरी केली. दोन्ही फलंदाजांनी 11-11 वेळा 50+ डावात धावा केल्या आहेत.

Pathum Nissanka
World Cup 2023: वॉर्नरची शतक ठोकत सचिनशी बरोबरी, रोहितच्याही विश्वविक्रमाच्या पोहचला जवळ

2023 मध्ये ODI फॉरमॅटमध्ये 50+ पेक्षा जास्त स्कोअर असलेले खेळाडू

11 – शुभमन गिल – भारत

11 – पथुम निसांका – श्रीलंका

10 – बाबर आझम – पाकिस्तान

09 – रोहित शर्मा – भारत

09 – विराट कोहली – भारत

Pathum Nissanka
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय, मॅक्सवेलचे विक्रमी शतक; वॉर्नरचेही सलग दुसरे शतक

पथुम निसांकाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

पथुम निसांकाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने श्रीलंकेसाठी (Sri Lanka) आतापर्यंत एकूण 95 सामने खेळले आहेत. दरम्यान, 100 डावात त्याच्या बॅटमधून 3197 धावा झाल्या आहेत.

निसांकाने कसोटी क्रिकेटच्या 15 डावांमध्ये 38.36 च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत, एकदिवसीय क्रिकेटच्या 44 डावात 38.1 च्या सरासरीने 1562 धावा केल्या आहेत आणि टी20 च्या 41 डावात 27.45 च्या सरासरीने 1098 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com