Goa Pro-League : पणजी फुटबॉलर्सचा ‘फाईव्ह स्टार’ विजय

गार्डियन एंजलवर ५-१ फरकाने सहज मात
Goa Football
Goa FootballDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी फुटबॉलर्सने रविवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबवर 5-1 फरकाने सहज मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. पणजी फुटबॉलर्सला पूर्ण तीन गुण मिळवून देताना निकलास नोरोन्हा व मॅक्झिमो डिकॉस्ता यांनी प्रत्येकी दोन, तर धीरज चौहानने एक गोल केला. चंदन ओराव याने गार्डियन एंजलसाठी गोल केला. दोन्ही संघ पूर्वार्धात 1-1 असे गोलबरोबरीत होते. मॅक्झिमो सामन्याचा मानकरी ठरला.

Goa Football
Margao : मडगावात फातीमा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दुकानावर छापा; दोघांना अटक

निकलासने २६व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सला आघाडी मिळवून दिली. 43व्या मिनिटास चंदनने गार्डियन एंजलला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात पणजी फुटबॉलर्सने आठ मिनिटांत तीन गोल करून सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. मॅक्झिमो याने 56व्या मिनिटास संघाला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. नंतर धीरजने ६०व्या मिनिटास पणजी संघाच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली. 64व्या मिनिटास मॅक्झिमोने आणखी एक गोल केला. निकलासने 76व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सच्या ‘पंचतारांकित’ विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com