PAK Vs AUS: पाकिस्तानने रचला इतिहास, 71 वर्षांत पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा!

Pakistan vs Australia Test Match: पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
Pakistani Bowler
Pakistani Bowler Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan vs Australia Test Match: पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजाने मोठा विक्रम केला आहे. पाकिस्तानने आपल्या 71 वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांनी एकाच डावात 8 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानला आजपर्यंत ही कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावा केल्या असल्या तरी पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

आमिर जमालने 6 विकेट घेतल्या

दरम्यान, पाकिस्तानी गोलंदाज आमिर जमाल आणि खुर्रम शहजाद यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आहे. आमिर जमालने 6 विकेट घेतल्या. याशिवाय खुर्रम शहजादनेही दोन विकेट्स घेतल्या. या दोन्ही खेळाडूंनी पदार्पणाच्या सामन्यातच हा पराक्रम केला. दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरने आपल्या संघासाठी 164 धावांची तूफानी इनिंग खेळली. या डावात शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला. याशिवाय, मिचेल मार्शनेही 107 चेंडूत 90 धावांची खेळी केली. हे दोनच खेळाडू होते ज्यांनी ऑस्ट्रेलियासाठी खास कामगिरी केली, याखेरीज इतर कोणत्याही खेळाडूला अर्धशतकही करता आले नाही.

Pakistani Bowler
Aus vs Pak: बाबर सेनेची हार, कांगारुंचा प्रहार! झाम्पाच्या फिरकीने पाकिस्तान गारद

वॉर्नरची शानदार खेळी

डेव्हिड वॉर्नरने रिटायरमेंट मालिकेत ही अप्रतिम खेळी खेळली. त्यामुळे चाहते त्याचे दिवाने झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एकूण 487 धावा केल्या. आता पाकिस्तान फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 2 गडी गमावून 132 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्या डावात 400 हून अधिक धावा कराव्या लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com