Aus vs Pak: बाबर सेनेची हार, कांगारुंचा प्रहार! झाम्पाच्या फिरकीने पाकिस्तान गारद

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 18 वा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
Australia Team
Australia TeamTwitter/ @ANI
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेत सलग दुसरा विजय आहे, तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव आहे.

बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 गडी गमावून 367 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांच्या शतकी भागीदारीनंतरही पाकिस्तान संघाने 27 चेंडू शिल्लक असतानाच सामना गमावला. पाकिस्तानने 45.3 षटकात 305 धावा केल्या.

पाकिस्तानकडून (Pakistan) इमाम उल हकने सर्वाधिक 70 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने चार तर स्टॉयनिसने दोन विकेट घेतल्या.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या होत्या.

वॉर्नर आणि मिशेलमध्ये पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 163 धावांची विस्फोटक खेळी खेळली.

तर दुसरीकडे, पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने पाच विकेट घेतल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी झाली. इमामने 70 धावांची तर शफीकने 64 धावांची खेळी खेळली.

मात्र, कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) केवळ 18 धावा करता आल्या. यानंतर पाकिस्तानने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, त्यामुळे आवश्यक धावगती वाढली आणि येणाऱ्या फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागले.

मोठ्या लक्ष्याच्या दबावाखाली मोहम्मद रिझवान (46) आणि सौद शकील (30) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रुपांतर करता आले नाही. पाकिस्तानने शेवटच्या 5 विकेट 36 धावांत गमावल्या.

Australia Team
Aus vs Pak: वॉर्नर-मार्शचा बंगळूरुमध्ये जलवा, शतके झळकावून रचला मोठा इतिहास; पाकिस्तानी गोलंदाजांवर बरसले!

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सलामीवीरांकडून दमदार सुरुवात झाली. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी झाली. मिचेल मार्श 108 चेंडूत 121 धावा करुन बाद झाला.

यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहीन आफ्रिदीने या दोन्ही फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. 39व्या षटकात उस्मानने स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हॅरिस रौफने डेव्हिड वॉर्नरला 163 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जोश इंग्लिशला केवळ 13 धावा करता आल्या. मार्कस स्टॉयनिसने 24 चेंडूत 21 धावा केल्या.

लॅब्युशेनला केवळ 8 धावा करता आल्या. यानंतर शाहीनने शेवटच्या षटकात मिचेल स्टार्क आणि हेजलवूडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com