Naveen-ul-Haq: 'हात मिळवला आणि...', विराटसोबत भाडंण मिटवताना झालेल्या संवादाबद्दल नवीनचा खुलासा

Virat Kohli: विराटबरोबर आयपीएलमध्ये झालेला वाद वर्ल्डकप सामन्यादरम्यान मिटवताना काय संवाद झाला, याबाबत नवीन उल हकने खुलासा केला आहे.
Virat Kohli - Naveen-ul-Haq
Virat Kohli - Naveen-ul-HaqPTI
Published on
Updated on

Naveen-ul-Haq open up on burying hatchet with Virat Kohli during India vs Afghanistan match in ICC ODI World Cup 2023:

बुधवारी (11 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात भारताचा फलंदाज विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील भांडण मिटले. याबद्दल नवीनने प्रतिक्रियाही दिली आहे.

चार महिन्यांपूर्वी म्हणजेच 1 मे रोजी आयपीएल 2023 मध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स स्पर्धेदरम्यान विराट आणि नवीन यांच्यात मोठा वाद झाला होता. या सामन्यानंतरही सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्यानेही त्यांच्याचील वाद चिघळले होते.

या वादानंतर हे दोघे पहिल्यांदाच बुधवारी आमने-सामने आले होते. त्यामुळे त्यांच्यातील वादाचा वर्ल्डकपमध्येही परिणाम दिसणार का, असा प्रश्न होता.

मात्र, सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून नवीनची खिल्ली उडवली जात असताना विराटने पुढे होत असे न करण्याबाबत सांगितले. तसेच सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांना भेटले, तसेच त्यांनी एकमेकांशी संवाद साधत गळाभेट घेतली आणि त्यांच्यातील वाद संपवले. त्यामुळे त्यांचे सध्या कौतुकही होत आहे.

Virat Kohli - Naveen-ul-Haq
World Cup 2023: 'बर्थ डे बॉय' हार्दिकची बॉलिंग अन् शार्दुल ठाकूरचा बाउंड्रीवर भन्नाट कॅच, पाहा Video

या घटनेबद्दल सामन्यानंतर पीटीआयशी बोलताना नवीनने सांगितले की "प्रेक्षक त्यांच्या घरच्या खेळाडूंना प्रोस्ताहन देणारच आणि त्यांनी तेच केले. हे विराटचे घरचे मैदान होते. तो एक चांगला व्यक्ती आहे, चांगला खेळाडू आहे आणि आम्ही हात मिळवले.'

'जे झाले, ते मैदानात झाले. मैदानाबाहेर काहीही नव्हते. लोकांनी त्याला मोठे बनवले. त्यांच्या फॉलोवर्ससाठी त्यांना अशा गोष्टीची गरज असते. विराट म्हणाला, 'आपल्यातील सर्व मिटले आहे आणि मग मीही म्हणालो की हो सर्व मिटले आहे.' त्यानंतर आम्ही हात मिळवले, गळाभेट घेतली."

दरम्यान, विराट आणि नवीन यांच्यातील वाद मिटल्याचे पाहून अनेक चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

Virat Kohli - Naveen-ul-Haq
Virat Kohli: क्रिकेट, कोटला आणि कोहली! दिल्लीमध्ये खेळण्याबद्दल 'लोकल बॉय' विराट भावूक, म्हणाला...

बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर अफगाणिस्तानने कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी (80) आणि अझमतुल्लाह उमरझाई (62) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग भारताने 35 षटकात 2 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली. तसेच विराटने नाबाद 55 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com