Santosh Trophy: लढले खरे पण हरले; ‘इंज्युरी टाईम’ गोलमुळे गोव्याला झटका

केरळची 3-2 फरकाने निसटती सरशी
moment of the match between Kerala and Goa
moment of the match between Kerala and GoaDainik Gomantak

Santosh Trophy: संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत शुक्रवारी माजी विजेत्या गोव्याने ‘अ’ गटात गतविजेत्या केरळला जोरदार टक्कर दिली, पण इंज्युरी टाईममध्ये गोल स्वीकारल्यामुळे त्यांना अखेरीस पराभवाचा झटका बसला. सामना ओडिशातील भुवनेश्वर येथे झाला.

ओ. एम. आसिफ याने 90+1व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे केरळने सामन्यात 3-2 अशी बाजी मारली. सामन्याच्या 74व्या मिनिटास आसिफ मैदानात बदली खेळाडू या नात्याने उतरला होता. इंज्युरी टाईममध्ये त्याचे हेडिंग भेदक ठरले. त्यामुळे गतविजेत्यांना पूर्ण तीन गुणांसह गटात खाते उघडता आले.

moment of the match between Kerala and Goa
Margao Crime : ख्रिसमस दिवशी गोव्यात झाला खून, तब्बल चार वर्षांनी दिल्लीच्या कामगाराला झाली जन्मठेप

पूर्वार्धात केरळचा संघ 1-0 फरकाने आघाडीवर होता. 27व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर निजो गिल्बर्ट याने सामन्यातील पहिला गोल केला. नंतर ५७व्या मिनिटास रिझवान अली एदाक्काविल याने केरळची आघाडी 2-0 अशी वाढविली.

मात्र नंतर गोव्याने जबरदस्त मुसंडी मारत 2-2 अशी बरोबरी साधली. महंमद फाहीज याने 60व्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारला, तर त्यानेच 73व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला.

दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळण्याची शक्यता असताना इंज्युरी टाईममध्ये ‘सुपर सब’ आसिफ केरळसाठी ‘मॅचविनर’ ठरला. स्पर्धेत गोव्याचा पुढील सामना रविवारी (ता. 12) यजमान ओडिशाविरुद्ध होईल, तर त्याचदिवशी केरळ कर्नाटकविरुद्ध खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com