World Cup 2023: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! भारताचा पाकिस्तानविरुद्ध सलग आठवा विजय

India vs Pakistan: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये ७ विकेट्सने दारुण पराभव केला.
Rohit Sharma - Virat Kohli
Rohit Sharma - Virat Kohli
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. हा भारताचा वनडे वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धचा सलग ८ वा विजय ठरला.

यापूर्वी भारताने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे.

दरम्यान, शनिवारी पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.3 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली.

Rohit Sharma - Virat Kohli
IND vs PAK: 36 धावांत 7 विकेट्स! पाकिस्तानची अशी उडाली दाणादाण, पाहा Video

भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, गिलला तिसऱ्या षटकात 16 धावांवर शाहिन आफ्रिदीने माघारी धाडले. यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माला चांगली साथ देत 56 धावांची भागीदारी केली. पण, विराट स्थिरावल्यानंतर हसन अलीविरुद्ध खेळताना मोहम्मद नवाजकडे झेल देत 16 धावांवर बाद झाला.

मात्र, यानंतर श्रेयस अय्यरने रोहितला चांगली साथ दिली. त्यांच्यात 77 धावांची भागीदारी झाली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच अर्धशतक झळकावलेल्या रोहितला 22 व्या षटकात शाहिन आफ्रिदीने इफ्किखार अहमदच्या हातून झेलबाद केले. रोहितने 63 चेंडूत 6चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावा केल्या.

त्यानंतर श्रेयस अय्यरने केएल राहुलच्या साथीत भारताला विजयापर्यंत पोहचवले. श्रेयसनेही अर्धशतक झळकावताना 62 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची नाबाद खेळी केली. तसेच केएल राहुल 19 धावांवर नाबाद राहिला.

Rohit Sharma - Virat Kohli
World Cup 2023: सात दिवस, नऊ सामने अन् 11 शतके! पहिल्याच आठवड्यात फलंदाजाचा धुमधडाका

तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक आणि इमाम-उल-हक यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी चांगली सुरुवात केली होती, पण 41 धावांची भागीदारी झाली असताना मोहम्मद सिराजने शफिकला 20 धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

त्यानंतर 13 व्या षटकात हार्दिक पंड्याने इमामला चकवले आणि 36 धावांवर विकेट घेतली. मात्र, यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 82 धावांची भागीदारी केली. पण, 30 व्या षटकात मोहम्मद सिराजनेअर्धशतकी खेळी केलेल्या बाबर आझमला 50 धावांवर त्रिफळाचीत केले आणि त्यांची जोडी फोडली.

यानंतर मात्र पाकिस्तानच्या संघाला पुनरागमन करता आले नाही आणि पुढच्या 7 विकेट्स पाकिस्तानने अवघ्या 36 धावांत गमावल्या. रिझवान 49 धावांवर बाद झाला. तसेच नंतर केवळ हसन अलीने (12) दोन आकडी धावसंख्या पार केली. त्यामुळे पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com