U19 World Cup Final: सिनियर टीम इंडियाकडूनही विश्वविजेत्या U19 India Women चे भरभरून कौतुक; Video

भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला संघाचे कौतुक केले आहे.
India Men's Cricket Team Congratulate U19 India Women
India Men's Cricket Team Congratulate U19 India WomenDainik Gomantak

U19 Women's T20I World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या पहिल्या १९ वर्षांखालील टी२० महिला वर्ल्डकपचे विजेतेपद भारताच्या युवा महिला संघाचे पटकावले. १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात १९ वर्षांखालील इंग्लंड महिला संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवले.

या विश्वविजेत्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचे सध्या मोठ्याप्रमाणात कौतुक होत आहे. भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघानेही त्यांचे अभिनंदन केले आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

India Men's Cricket Team Congratulate U19 India Women
U19 World Cup Final: विश्वविजयाचा आनंदच न्यारा! वर्ल्डकप जिंकताच U19 Team India चा भन्नाट डान्स

या व्हिडिओमध्ये दिसले की भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले की '१९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेटसाठी आज महत्त्वाचा दिवस होता.' तसेच नंतर द्रविडने पृथ्वी शॉकडे माईक दिला.

शॉने युवा भारतीय महिलांचे अभिनंदन करताना म्हटले, 'हे मोठे यश आहे. १९ वर्षांखालील महिला संघाचे सर्वांना अभिनंदन करायचे आहे. तुमच्या सर्वांचे खूप अभिनंदन.'

पृथ्वी शॉ २०१८ साली १९ वर्षांखालील पुरुष वनडे वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय संघाचा कर्णधार होता. विशेष म्हणजे त्यावेळी १९ वर्षांखालील पुरुष भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड होता. त्याचबरोबर सध्या भारताच्या वरिष्ठ संघाचे भाग असलेले शुभमन गिल आणि शिवम मावी हे देखील त्या विश्वविजेत्या संघाचे भाग होते.

(India Men's Cricket Team Congratulate U19 India Women For winning U19 T20 Women World Cup Title)

India Men's Cricket Team Congratulate U19 India Women
U19 Team India च्या पोरींचा संघर्षही मोठाच! कोणाचे वडील शिपाई, कोणाच्या आईने सोसले घाव

भारतीय महिला संघाला ५ कोटी रुपयांचे बक्षीस

दरम्यान युवा भारतीय महिला संघाने पहिला १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप जिंकल्याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कौतुक केले आहे. तसेच त्यांनी रविवारी लगेचच विश्वविजेत्या भारतीय संघासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

भारतीय संघाचा इंग्लंडवर विजय

भारतीय महिला संघाला इंग्लंडने विजयासाठी माफक ६९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय महिला संघाने केवळ १४ षटकातच पूर्ण केला. या सामन्यात २ विकेट्स घेणारी तितास साधू या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिने भारताकडून या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करताना ४ षटकांत २ विकेट्स घेताना केवळ ६ धावा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com