ICC ODI Cricket World Cup 2023, Most Runs and Most Wickets:
रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यानंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा मान भारताच्या विराट कोहली आणि मोहम्मद शमीने पटकावला आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने वर्ल्डकप 2023 मध्ये 11 सामन्यांत 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तो वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात एका स्पर्धेत 750 धावा करणारा पहिलाच खेळाडू देखील आहे.
त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने 11 सामन्यांत 597 धावा केल्या आहेत.
वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
765 धावा - विराट कोहली (11 सामने)
597 धावा - रोहित शर्मा (11 सामने)
594 धावा - क्विंटन डी कॉक (10 सामने)
578 धावा - रचिन रविंद्र (10 सामने)
552 धावा - डॅरिल मिचेल (9 सामने)
वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आहे. त्याने 7 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो भारताकडून एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे.
त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा आहे. त्याने 11 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
24 विकेट्स - मोहम्मद शमी (7 सामने)
23 विकेट्स - ऍडम झम्पा (11 सामने)
21 विकेट्स - दिलशान मदुशंका (9 सामने)
20 विकेट्स - जसप्रीत बुमराह (11 सामने)
20 विकेट्स - गेराल्ड कोएट्झी (8 सामने)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.