Hockeywali Sarpanch: स्वतः ची कमाई प्रशिक्षक, युनिफॉर्मसाठी देणारी ‘हॉकीवाली सरपंच‘ आहे तरी कोण?

राजस्थानमधील एका छोट्या गावातील एका महिला सरपंचाला हॉकीवाली सरपंच म्हणून ओळखले जाते
Neeru Yadav
Neeru YadavTwitter

Who is Hockeywali Sarpanch?: आजही अनेकदा मुलींना आपल्या देशात खेळात कारकिर्द घडवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अनेकदा कुटुंबातून, समाजातून यासाठी विरोधही होतो. पण राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील लांबी अहिर गावातील महिला संरपंचच एक पूर्ण हॉकी संघ चालवले. पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता.

याच गावात काही वर्षांपूर्वी मुलींना घराबाहेर पाठवणेही मोठी गोष्ट मानली जात होती. पण आता याच गावातील सर्वात युवा सरपंच असलेली नीरु यादवने गावातील मुलींना खेळात पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ती आता हॉकीवाली सरपंच म्हणूनही ओळखली जाते.

नीरुला राजकारणात उतरण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या आजोबांनी प्रेरणा दिली. ते एकदा सरपंच पदासाठी निवडणूक लढले होते. तिच प्रेरणा घेत नीरू ऑक्टोबर २०२० मध्ये सरपंच बनली. तेव्हापासून ती गावात मुलींसाठी काही योजना राबवत आहे.

ती सध्या गावातील मुलींच्या हॉकी संघाला १० जुलै पासून सुरू होणाऱ्या राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक गेम्ससाठी तयार करत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात लांबी अहिर गावचा संघ विजेता ठरला होता आणि त्यामुळे तो जिल्हास्थरावर खेळण्यासाठीही पात्र ठरला होता.

Neeru Yadav
Hockey Pro League साठी टीम इंडियाची घोषणा, 'हा' खेळाडू करणार कॅप्टन्सी; कोणाविरुद्ध होणार मॅच जाणून घ्या

दरम्यान, मुलींचा खेळांमध्ये रस निर्माण करणे आणि त्यांच्या पालकांचे मन वळवणे हे तिच्या समोरील सर्वात मोठे आव्हान होते.

तिने तिच्या अनुभवाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले, 'गेल्या वर्षी ग्रामीण गेम्स सुरू होण्यासाठी ४-५ दिवस राहिलेले असताना आम्ही ट्रेनिंगचा वेळ थोडा वाढवला. मुलींना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घरी पोहचवण्यात आले होते. पण त्यावेळी हिवाळा असल्याने तोपर्यंत अंधार पडत होता.'

'त्यामुळे सर्व पालकांनी त्यांच्या मुलींना उशीरापर्यंत सराव करण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या सर्वांना भेटून त्यांना विश्वास द्यावी लागला की त्यांच्या मुलांना लवकर घरी सोडले जाईल. हे कठीण होते पण मी हार मानली नाही आणि अखेर त्यांची परवानगी मिळवली.'

Neeru Yadav
Women's Junior Hockey Asia Cup: भारताच्या पोरींनी रचला इतिहास! पहिल्यांदाच उंचावला आशिया चषक

इतकेच नाही, तर नीरुने तिची कमाईदेखील मैदान तयार करण्यासाठी, हॉकी किट आणि युनिफॉर्म खरेदीसाठी, तसेच प्रशिक्षक नेमणूकीसाठी दान केली. सध्या तिचा आता हॉकीनंतर कबड्डी संघ बनवण्याचाही मानस आहे.

दरम्यान, नीरू ही उच्चशिक्षित देखील आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून नीरू आली आहे. तिचा नवरा इंजिनियर असून तिने गणित विजयात पद्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्याचबरोबर तिन बीएड आणि एमएडची पदवीही घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com