ISL Football: एफसी गोवा संघाच्या बचावफळीत 'हा' नवा चेहरा

स्पॅनिश खेळाडूची जायबंदी मार्क व्हालिएंतेच्या जागी निवड
Hernan Santana
Hernan SantanaDainik Gomantak
Published on
Updated on

ISL Football: स्पॅनिश बचावपटू मार्क व्हालिएंते दुखापतीमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या बाकी मोसमास मुकल्यानंतर एफसी गोवा संघाने त्याच्या जागी स्पेनच्याच हर्नन सांताना याची निवड केली आहे.

एफसी गोवा संघाने करारबद्ध करण्यापूर्वी ३२ वर्षीय सांताना चीनमधील लीग-वन स्पर्धेत सिचुआन जिऊनिऊ संघातर्फे खेळत होता. एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा या संघाचे प्रशिक्षक असून त्यांना आठवा क्रमांक मिळाला होता.

Hernan Santana
Goa Tourism Advisory: दारु, सेल्फी, टॅक्सीबाबत गोव्यातील नियम बदलले, 50,000 दंडाची तरतूद; जाणून घ्या नवे 'नियम'

सांताना आता चीनमधून गोव्यात दाखल झाला. ‘‘एफसी गोवा संघाने संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. एफसी गोवाला भारतातील सर्वोत्तम संघांत गणले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून खेळण्याबाबत विचारणा झाल्यानंतर मी लगेच होकार दिला,’’ असे सांताना याने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांतानाचे संघात स्वागत केले. ‘‘तो सेंटर बॅक खेळाडू असला तरी मध्यफळीतील नियंत्रण राखू शकतो. त्याच्या निवडीमुळे संघात पर्याय उपलब्ध झाला आहे,’’ असे रवी म्हणाले.

Hernan Santana
Fire In Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना; घरासह काजूची बाग खाक

हर्नन सांताना याची कारकीर्द

स्पेनमधील यूडी लास पाल्मास संघात जडणघडण, २०१० या संघाच्या राखीव संघात पदार्पण

२०११ पासून लास पाल्मास संघाच्या सीनियर संघाचे सात मोसम प्रतिनिधित्व, २०१५ मध्ये ला-लिगासाठी पात्रता

सांतियागो बेर्नाब्यू येथे वलयांकित रेयाल माद्रिदविरुद्ध सांतानाचा एकमेव ला-लिगा गोल

२०१९-२० मध्ये आयएसएल स्पर्धेतील मुंबई सिटीशी लोन करार

मुंबईतील संघातर्फे आयएसएल लीग विनर्स शिल्ड व आयएसएल करंडकाचा मानकरी, २३ सामन्यांत २ गोल

२०२१ मध्ये आयएसएलमधील गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाशी करार, काही सामन्यांत संघाचे नेतृत्व

गतमोसमात चीनमधील सिचुआन जिऊनिऊ संघात दाखल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com