Indian Super League: संदेशच्या दुखापतीमुळे एफसी गोवाला धक्का

Indian Super League: संदेशच्या उजव्या गुडघ्याला दुखापत
Sandesh Zingan
Sandesh ZinganDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League: संघातील प्रमुख बचावपटू संदेश झिंगन याच्या गंभीर दुखापतीमुळे एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच मोठा धक्का बसला.

या संदर्भात क्लबने मंगळवारी रात्री निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार, आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघातून खेळताना संदेशच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली.

विविध सविस्तर वैद्यकीय चाचण्यानंतर पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी संदेशला काही काळ स्पर्धात्मक फुटबॉलमधून विश्रांती घ्यावी लागेल. तो कधी उपलब्ध होईल याबाबत स्पष्टता नाही.

Sandesh Zingan
Goa Crime Case: मोपा विमानतळ परिसरात ओडिशातील व्यक्तीवर हल्ला; स्थानिकांविरुद्ध गुन्हा दाखल

एफसी गोवा संघाने यंदाच्या आयएसएल स्पर्धेत 10 पैकी सात सामने जिंकले असून तीन बरोबरी नोंदविल्या आहेत. 24 गुणांसह मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ दुसऱ्या स्थानी आहे.

संघाने स्पर्धेत सहा क्लीन शीट्स नोंदविल्या असून त्यात संदेशचा मोलाचा वाटा आहे. मोसमातील 10 आयएसएल सामन्यांत तो 900 मिनिटे खेळला असून एक गोलही केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com