Goa Crime Case: मोपा विमानतळ परिसरात ओडिशातील व्यक्तीवर हल्ला; स्थानिकांविरुद्ध गुन्हा दाखल

Mopa Airport: सदर तक्रारदाराने टॅक्सी चालकाची टाउटिंगची तक्रार पोलीस कर्मचाऱ्यांकडे केली होती.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

Mopa Airport: मोपा विमानतळ पोलीस ठाण्यात मूळ ओडिशातील एका व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी काही स्थानिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सदर तक्रारदाराने मोपा विमानतळ टॅक्सी पार्किंग परिसरात ग्राहकाला फोन करणाऱ्या एका टॅक्सी चालकाची टाउटिंगची तक्रार पोलीस कर्मचाऱ्यांकडे केली होती. याचाच राग मनात धरून हे कृत्य केल्याचे बोलले जातेय.

Mopa Airport
Goa Drugs Case: हणजूणमध्ये 5 लाखांचा गांजा जप्त; ओडिसातील एकाला अटक

घटनेसंबंधी माहिती अशी की, आज 30जानेवारी रोजी गोविंदा नाईम गोविंदा नामक व्यक्ती सुरक्षा कंपनीने दिलेल्या वाहनाने त्याच्या भाड्याच्या खोलीकडे जात होती.

यावेळी वारखंड क्रिकेट मैदानाजवळ पोहोचल्यानंतर सुमारे 50 ते 60 लोकांच्या एका गटाने त्याचा मार्ग अडवत त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांवर बिअरच्या बाटल्या आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.

दरम्यान पोलिसांनी स्थानिकांविरुद्ध आयपीसी कलम 143, 147, 148, 341, 323, 324, 506 आर/डब्ल्यू 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com