Michael Vaughan: वर्णद्वेषी प्रकरणी इंग्लंडच्या माजी कर्णधाराला 12 वर्षांनंतर दिलासा, सर्व आरोप फेटाळले

Michael Vaughan: 2009 मध्ये यॉर्कशायर संघात समाविष्ट असलेल्या आशियाई वंशाच्या खेळाडूंच्या गटावर वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप या दिग्गजाने केला होता.
Michael Vaughan
Michael VaughanDainik Gomantak
Published on
Updated on

Michael Vaughan: इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनवरील वर्णद्वेषाचे आरोप आता संपले आहेत. शिस्तपालन समितीने त्यांच्यावरील वर्णद्वेषाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

2009 मध्ये यॉर्कशायर संघात समाविष्ट असलेल्या आशियाई वंशाच्या खेळाडूंच्या गटावर वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप या दिग्गजावर करण्यात आला होता. या प्रकरणात वॉनला 12 वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे.

मायकल वॉन यांनी माहिती दिली

मायकेल वॉन यांनी आज, 31 मार्च 2023 रोजी स्वत: माहिती देताना सांगितले की, 'इंग्लंड (England) क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन आयोगाने मला वर्णद्वेषी आणि भेदभावपूर्ण भाषा वापरल्याबद्दल निर्दोष मुक्त केले आहे.'

या प्रकरणाची लंडनमध्ये सुनावणी तीन सदस्यीय समितीने केली होती. पॅनेलने आपला निकाल जाहीर करताना वॉनची निर्दोष मुक्तता केली आहे.

या खेळाडूंनी मायकल वॉनवर आरोप केले होते

खरे तर, 2009 मध्ये अझीम रफिकने मायकल वॉनवर त्यावेळी वर्णद्वेषाचा आरोप केला होता, जेव्हा मायकल वॉन यॉर्कशायरकडून क्रिकेट खेळत होते. अझीमशिवाय आदिल रशीद, राणा नावेद-उल-हसन आणि अजमल शहजाद यांनीही वॉनवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता.

यापूर्वी, इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने आपल्यावरील आरोप आणि केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल माफी मागितली होती.

वॉनने कबूल केले की, केसच्या सुनावणीदरम्यान ECB चे प्रमुख वकील जेन मुल्काही केसी यांनी जवळजवळ 90 मिनिटे चौकशी केली तेव्हा त्यांचे ट्विट अस्वीकार्य होते. दरम्यान, वॉनने या ट्विटबद्दल माफी मागितली आहे.

काय होते संपूर्ण प्रकरण

क्रिकेटर अझीम रफिकने मायकेल वॉनवर आरोप केला होता की, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने टी-20 सामन्यादरम्यान त्याला आणि इतर आशियाई वंशाच्या खेळाडूंना लक्ष्य केले होते. त्याने म्हटले होते की, "तुमच्या लोकांची संख्या खूप वाढली आहे, आम्हाला याबद्दल काहीतरी करण्याची गरज आहे".

वास्तविक, मायकेल वॉनने 15 ऑक्टोबर 2010 रोजी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'लंडनमध्ये (London) फारसे इंग्लिश लोक राहत नाहीत, मला नवीन भाषा शिकण्याची गरज आहे. या ट्विटसाठी वॉनची निंदा करण्यात आली होती, ज्याचा संबंध वर्णद्वेषाशी जोडला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com