Video: खेळ पावसाचा अन् गरबा चाहत्यांचा! IPL Final दरम्यान दिसलं अनोखं दृश्य

आयपीएल २०२३ फायनलमध्ये चाहते गरबा खेळताना दिसले होते.
IPL 2023 Fans
IPL 2023 FansDainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात सातत्याने पावसाचा अडथळा आला आहे.

हा सामना रविवारी होणार होता. मात्र रविवारी अहदाबादला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हा सामना रविवारऐवजी सोमवारी राखीव दिवशी हलवण्यात आला. सोमवारी निर्धारित वेळेत सामना सुरू झाला. तसेच गुजरातने पूर्ण २० षटके फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ४ बाद २१४ धावा केल्या.

IPL 2023 Fans
MS Dhoni in IPL 2023: बापरे! धोनीच्या घोषणेच्या आवाजाने विमानालाही टाकलंय मागे, चकीत करणारा डेटा आला समोर

मात्र, त्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी सुरू झाली, तेव्हा ३ चेंडूंचाच खेळ झाला असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मैदान पूर्ण ओले झाले होते. अखेर पावसामुळे जवळपास २ तास सामना थांबला.

या दोन तासादरम्यान चाहत्यांनी मात्र स्टेडियममध्येच आनंद घेतला. झाले असे की मैदान ओले असल्याने खेळण्यासाठी पूर्ण तयार होत असताना स्टेडियममध्ये गाणी लावण्यात आली होती. त्यावेळी स्टेडियममध्ये असलेल्या चाहत्यांनी त्या गाण्यांवर ठेका धरला. यावेळी चाहते गरबा करतानाही दिसले. चाहते गरबा करत असतानाचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

IPL 2023 Fans
IPL 2023: आयपीएल फायनलमध्ये हार्दिक करणार मोठा रेकॉर्ड नावावर, धोनीची इच्छा असूनही...!

गुजरातच्या 214 धावा

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. गुजरातकडून सलामीला शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी चांगली सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. पण गिल 39 धावांवर बाद झाला.

त्यानंतरही साहा आणि साई सुदर्शन यांनी डाव सावरला. पण साहा 54 धावांवर बाद झाला. पण त्यानंतरही कर्णधार हार्दिक पंड्याने सुदर्शनची चांगली साथ दिली. सुदर्शन शतकाजवळही पोहचला होता. मात्र 96 धावांवर असताना तो अखेरच्या षटकात बाद झाला. अखेरीस हार्दिक 21 धावांवर नाबाद राहिला.

चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com