Croatia vs Morocco: फिफा विश्वचषक स्पर्धेतील गत उपविजेता क्रोएशिया आणि जायंट किलर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्को यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी शनिवारी लढत झाली. यात क्रोएशियाने मोरोक्कोवर 2-1 गोलफरकारने विजय मिळवत स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
(FIFA Football World Cup 2022)
खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना झाला. पुर्वार्धात सामन्याच्या सातव्या मिनिटाला गार्डिओलने क्रोएशियासाठी पहिला गोल केला. जोस्को गार्डिओल हा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियासाठी गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्यांचे वय सध्या 20 वर्षे 328 दिवस आहे
यानंतर नवव्या मिनिटाला मोरोक्कोच्या अश्रफ दारी याने गोल करून स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 42 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मिस्लाव ओरसिकने गोल करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अशा रितीने मध्यंतरापर्यंतच क्रोएशियाने 2-1 अशी आघाडी घेतली होती.
या विश्वचषकात याआधी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. गटातील हा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला होता. क्रोएशिया जागतिक क्रमवारीत 12 व्या, तर मोरोक्को 22 व्या स्थानावर आहे.
दरम्यान, उद्या, 18 डिसेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना होत आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता या सामन्याला सुरवात होईल. या अंतिम सामन्यात स्पर्धेचा तो विजेता ठरेल त्या संघाला 350 कोटी रूपयांचे बक्षिस कोटी रूपयांचे बक्षिस मिळेल.
फिफातर्फे या स्पर्धेसाठी सुमारे 3500 कोटी रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यात विजेत्या संघाला 350 कोटी रूपयांचे बक्षीस मिळेल. तर उपविजेत्या संघाला सुमारे 350 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाला सुमारे 220 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला 204 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. 5 व्या ते 8 व्या स्थानावर असलेल्या संघांना सुमारे 138 कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. 9 व्या ते 16 व्या क्रमांकावर असलेल्या संघांना सुमारे 106 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल आणि 17 व्या ते 32 व्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना सुमारे 74 कोटी रुपये मिळतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.