Chelsea: अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडीजसाठी चेल्सीचा रेकॉर्डब्रेक करार

चेल्सीने एन्झो फर्नांडीजसाठी रेकॉब्रेक रक्कम मोजली आहे.
Enzo Fernandez
Enzo FernandezDainik Gomantak
Published on
Updated on

Enzo Fernandez: फुटबॉल विश्वातून बुधवारी मोठी बातमी समोर आली. चेल्सी क्लबने बेनफिका एफसीचा मिडमिल्डर एन्झो फर्नांडीझसाठी तब्बल 105 दशलक्ष पौंड रुपये खर्च केले आहेत. याबद्दल बेनफिकाने पुष्टी केली आले.

फर्नांडीजसाठी बेनफिका आणि चेल्सी यांच्यात वाटाघाटी सुरू होती. अखेर या वाटाघाटीनंतर 22 वर्षीय फर्नांडीझसाठी चेल्सीने रिलीज फी भरण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला. फर्नांडीझ 2022 फिफा वर्ल्डकप विजेत्या अर्जेंटिना संघाचा भाग होता.

यापूर्वी 2021 मध्ये इंग्लंडचा मिडफिल्डर जॅर ग्रीलिशसाठी मँचेस्टर सिटीने अ‍ॅस्टन व्हिलाला 100 दशलक्ष पौंड रिलीज फी दिली होती.

Enzo Fernandez
Argentina: कल्ला होणारच! तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकप अर्जेंटिनात, पाहा राजधानीतील थक्क करणारी दृश्य

फर्नांडीजने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. त्याने रिव्हर प्लेटसाठी 2019 साली पदार्पण केले होते. तो एका वर्षाने लोनवर डिफेन्से खुस्तिसियाकडून खेळला. या संघाकडूनही त्याने चांगली कामगिरी केली.

त्याने 2022 मध्ये रिव्हर प्लेटकडून 28 सामन्यांत 10 गोल केले होते. त्यानंतर 2022 मध्ये बेनफिकाने त्याला संघात घेतले. त्याने या हंगामात 29 सामन्यांत 4 गोल आणि 7 असिस्ट केले. पण आता १ वर्षातच चेल्सीने त्याच्याबरोबर करार केला आहे.

Enzo Fernandez
Lionel Messi: विश्वविजेच्या मेस्सीचे PSG संघात ग्रँड वेलकम! नेमारच्या कमेंटनेही वेधले लक्ष

पण फर्नांडीज प्रकाशझोतात आला तो अर्जेंटिनाकडून खेळताना. त्याने सप्टेंबर 2022 मध्ये अर्जेंटिनाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर लगेचच त्याला 2022 चा फिफा वर्ल्डकप खेळण्याचीही संधी मिळाली. तो या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम युवा खेळाडूही ठरला. आता तो इंग्लंडमधील प्रमुख फुटबॉल क्लबपैकी एक चेल्सीकडून खेळताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com