Carlos Alcaraz: कार्लोस अल्कारेझने रचला इतिहास, नोव्हाक जोकोविचला मागे टाकून बनला नंबर वन टेसिनपटू

ATP Ranking: कार्लोस अल्कारेझने नव्या एटीपी क्रमवारीत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने नोव्हाक जोकोविचला मागे सोडले.
Carlos Alcaraz & Novak Djokovic
Carlos Alcaraz & Novak DjokovicDainik Gomantak

Carlos Alcaraz: कार्लोस अल्कारेझने नव्या एटीपी क्रमवारीत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचला मागे सोडले. यासह तो आता जगातील नंबर वन पुरुष टेनिसपटू बनला आहे. 28 मेपासून सुरु होणाऱ्या फ्रेंच ओपनपूर्वी ही क्रमवारी आली आहे. याच कारणामुळे कार्लोस अल्कारेझला फ्रेंच ओपनमध्ये अव्वल मानांकन मिळाले आहे.

दरम्यान, इटालियन ओपनचे विजेतेपद पटकावणारा डॅनिल मेदवेदेव नव्या एटीपी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता म्हणून रोममध्ये दाखल झालेल्या नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) चौथ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे तो क्रमवारीत एका स्थानाने घसरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे.

Carlos Alcaraz & Novak Djokovic
Novak Djokovic: लाईव्ह सामन्यात विरोधी खेळाडूच्या 'त्या' कृत्याने चिडला जोकोविच, पाहा Video

अल्केरेझ फक्त 20 वर्षांचा आहे

कार्लोस अल्कारेझ फक्त 20 वर्षांचा आहे. एवढ्या कमी वयात तो जगातील नंबर 1 खेळाडू बनला आहे. त्याने 2023 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2023 मध्ये 30 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

ग्रँड स्लॅम जिंकला

कार्लोस अल्कारेझच्या बाबतीत, त्याने आतापर्यंत केवळ एक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले आहे. 2022 मध्ये, ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत, फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत, बिवाल्डन ओपनच्या चौथ्या फेरीत तो बाहेर पडला होता, जरी त्याने यूएस ओपनमध्ये शानदार पुनरागमन केले आणि ट्रॉफी जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com