Goa Ranji Cricket Team : अमूल्य पांड्रेकरचे भवितव्य प्रश्नांकित; डावखुऱ्या फिरकी गोलंदाजास स्थान नाही

गोव्याचा रणजी (सीनियर) क्रिकेट शिबिरासाठी संभाव्य संघाची निवड
Amulya Pandrekar
Amulya PandrekarDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा रणजी (सीनियर) क्रिकेट शिबिरासाठी संभाव्य संघ निवडताना गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांत गतमोसमातील कामगिरीच्या आधारे नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

त्यामुळे सात मोसम रणजी संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अमूल्य पांड्रेकरला स्थान मिळाले नाही, या कारणास्तव आता 27 वर्षीय गोलंदाजांचे एकंदरीत भवितव्य प्रश्नांकित बनले आहे.

गोव्याचा रणजी क्रिकेट संघ कर्णधार दर्शन मिसाळ यशस्वी डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. गतमोसमात कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत चमलेला कीथ पिंटो व गोवा प्रीमियर लीग स्पर्धेत फलंदाजीतही उपयुक्त ठरलेला विकास सिंग यांना डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना संघ निवडीत अमूल्यच्या पुढे स्थान मिळाले.

Amulya Pandrekar
अपयशाने खचतील ते गडकरी कसले, गोव्यात स्कायबसची चाचणी अयशस्वी ठरल्यानंतर आता पुण्याला संधी

रणजी स्पर्धेत बळींचे अर्धशतक

अमूल्यने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बळींचे अर्धशतक नोंदविताना २८ सामन्यांतून ५२ गडी बाद केले आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये अहमदाबाद येथे मुंबईविरुद्ध तो शेवटचा रणजी करंडक सामना खेळला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात मिळून त्याने एकण ९५ विकेट मिळविल्या आहेत. रणजी क्रिकेट स्पर्धेत त्याने एका अर्धशतकासह ५९८ धावाही केल्या आहेत.

Amulya Pandrekar
Tilak Varma: तिलकचा जिगरी दोस्ताला द. आफ्रिका संघात निवड होताच स्पेशल व्हिडिओ कॉल...

अखेरच्या डावात ५ विकेट

गोव्याच्या वयोगट संघातून खेळताना डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने शानदार सातत्य प्रदर्शित केले, अमूल्यने जानेवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा रणजी क्रिकेट कॅप मिळविली.

त्यानंतर तो सलगपणे गोव्याच्या सीनियर संघाचा भाग बनला. गतमोसमात (२०२२-२३) तो गोव्याकडून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळला.

मात्र रणजी स्पर्धेतील सातही सामन्यांसाठी तो संघाबाहेर होता. विशेष बाब म्हणजे, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी विजय हजारे करंडक स्पर्धेत अळूर-बंगळूर येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध अप्रतिम मारा करताना डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

त्या डावात ९-०-४१-५ असे चमकदार गोलंदाजी पृथ्थकरण राखल्यानंतर अमूल्य पुन्हा गोव्यातर्फे खेळला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com