FIFA U-17 WC: सलामीच्या सामन्यात भारताचा अमेरिकेकडून 0-8 असा मोठा पराभव

पदार्पणातच भारतीय संघाला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे.
FIFA U-17 WC: सलामीच्या सामन्यात भारताचा अमेरिकेकडून 0-8 असा मोठा पराभव
Published on

FIFA U-17: पदार्पणातच भारतीय संघाला अमेरिकेकडून मोठा पराभव पत्करावा लागला आहे. 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेसोबत झाला. बलाढ्य अमेरिकेपुढे भारताचा निभाव लागला नाही व संघाला 0-8 असा मोठा पराभव पत्करावा लागला.

(America Beat Indian Football team by 0-8 in FIFA Under 17 football World Cup )

अमेरिकेच्या संघाने सुरूवातीपासूनच चेंडूवर मजबूत पकड मिळवली. अमेरिका संघाकडे तब्बल 79 टक्के वेळ चेंडू होता.

FIFA U-17 WC: सलामीच्या सामन्यात भारताचा अमेरिकेकडून 0-8 असा मोठा पराभव
Mayor Damodar shirodkar: मडगावच्या नगराध्यक्षपदी 'दामोदर शिरोडकर' बिनविरोध

अमेरिकेच्या संघाने गोलच्या दिशेने 30 फटके मारले, त्यात आठमध्ये त्यांना यश आले. तर, भारतीय संघ केवळ दोनच फटके अमेरिकेच्या गोलच्या दिशेने मारू शकला.

भारतीय महिला फुटबॉल संघाचे पहिल्यांदाच विश्वचषकात पदार्पण झाले आहे. त्यात पहिलाच सामना गमावल्यानंतर भारतीय चाहते नाराज असले तरी आगामी सामन्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहे.

FIFA U-17 WC: सलामीच्या सामन्यात भारताचा अमेरिकेकडून 0-8 असा मोठा पराभव
MIG29 Fighter Jet Crash: गोव्यात लढाऊ विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे अपघात

भुवनेश्वर येथे झालेल्या या सामन्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com