Retirement: अफगाणिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडताच 24 वर्षीय क्रिकेटर वनडेतून निवृत्त! शेअर केला भावूक Video

Naveen-ul-Haq Retirement: अफगाणिस्तानचे वर्ल्डकप 2023 मधील आव्हान संपल्यानंतर 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.
 Afghanistan Cricket
Afghanistan Cricket

Afghanistan Cricketer Naveen ul haq retires from ODI Cricket:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना होता.

या सामन्यात पराभव झाल्याने अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील आव्हानही संपले. त्यामुळे या सामन्यानंतर अफगाणिस्तानचा 24 वर्षीय वेगवाग गोलंदाज नवीन-उल-हक वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

नवीनने यापूर्वीच सांगितले होते की वर्ल्डकप 2023 ही त्याची अफगाणिस्तानकडून खेळलेली अखेरची वनडे मालिका असणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने वर्ल्डकप 2023 मधील अखेरचा सामना खेळल्यानंतर नवीननेही सोशल मीडियावर पोस्ट करत वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

नवीनने 2016 साली सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानसाठी 15 वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने 22 विकेट्स घेतल्या. मात्र, त्याला त्याच्या अखेरच्या वनडे सामन्यात विकेट घेता आली नाही.

 Afghanistan Cricket
Naveen-ul-Haq: 'हात मिळवला आणि...', विराटसोबत भाडंण मिटवताना झालेल्या संवादाबद्दल नवीनचा खुलासा

दरम्यान, वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्याच्या वनडे कारकिर्दीतील काही क्षण व्हिडिओ स्वरुपात शेअर केले आहेत. तसेच त्याने कॅप्शनमध्ये '10/11/2023. थँक्यू' असे लिहिले आहे.

त्याचबरोबर त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की 'मी खूप अभिमानाने पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत ही जर्सी घातली. तुमच्या सर्वांच्या मेसेज आणि शुभेच्छांबद्दल आभार.'

टी20 खेळणार नवीन

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की नवीन जरी वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी, तो अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी20 खेळणार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 27 सामने खेळले असून 34 विकेट्स घेतल्या आहेत.

 Afghanistan Cricket
World Cup 2023: पाकिस्तान की न्यूझीलंड, भारताविरुद्ध कोण खेळणार सेमीफायनल? कोलकातामध्ये होणार निर्णय

तसेच नवीन जगभरातील विविध टी20 क्रिकेट लीग स्पर्धा खेळतो. तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. तसेच लंका प्रीमियर लीग, बीग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा स्पर्धांमध्येही नवीन खेळला आहे.

अफगाणिस्तानची शानदार कामगिरी

अफगाणिस्तानचे आव्हान संपले असले तरी अफगाणिस्तान शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीत होते. पण अखेरच्या दोन्ही साखळी सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि त्यांना या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले. अफगाणिस्तानने 9 पैकी 4 सामने जिंकले.

अफगाणिस्तानने या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडसह पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांना पराभवाचा धक्का दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com