शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी यकृत महत्वाची भूमिका पार पाडतो. दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत (Liver) दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये यकृताच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घेऊया यकृताची कशी काळजी घ्यावी. (World Liver Day)
* औषधाचा अतिवापर
तुम्ही जर औषधाचे अधिक सेवन करत असाल तर ते आरोग्यासाठी(Health) घातक ठरू शकते. यामुळे ताप, सर्दी यासारख्या आजारांवर नेहमी औषध घेणे टाळावे.
* कमी झोप
निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप (Sleep) घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर पुरेशी झोप घेत नसाल तर यकृताचे आरोग्य घरब होऊ शकते. असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. कमी झोपेमुळे व्यक्तीचा मानसिक ताण वाढू शकतो.
* लठ्ठपणा
तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढून यकृत खराब होऊ शकते. जंक फूड,तेलकट पदार्थ यासारख्या पदार्थांचे अतिसेवण केल्यास यकृताचे आरोग्य खराब होऊ शकते. लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या लोकांना या समस्येचा त्रास अधिक होतो.
'अ' जीवनसत्वाचे सेवन अधिक
तुमच्या शरीरात 'अ' जीवनसत्वाचे सेवन अधिक केल्यास यकृताचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. 'अ' जीवनसत्व निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण याचे अतिसेवण केल्यास तुमचे यकृत घरब होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.