Health Tips: 'अंघोळ करूनच जेवावं' असं का सांगितलं जातं? जाणून घ्या सविस्तर

धावपळीच्या जगात माणसाच्या आहारविहाराच्या गोष्टी आणि वेळ बदलत चालली आहे
Health Tips
Health TipsDainik Gomantak

दैनंदिन जीवनशैलीत सकाळी लवकर उठून अंघोळ करण्यास सांगितले आहे. जेणेकरून शरीर ताजेतवाने होऊन दिवसभर शरीर आणि मन उत्साही राहते. परंतु सध्या धावपळीच्या जगात माणसाच्या आहारविहाराच्या गोष्टी आणि वेळ बदलत चालली आहे. त्यामुळेच रोग आजारांचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे.

फार पूर्वीपासून अंघोळ केल्यावरच जेवायचं असा आपल्याकडे प्रघात आहे. यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? याबद्दल जाणून घेऊया

पूर्वीच्या तुलनेत आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीत आणि जीवनशैलीत खूप बदल झाला आहे. आता लोकांची कामाची, आंघोळीची आणि खाण्याची निश्चित वेळ नाही. आपण आपल्या कामाच्या वेळेनुसार कधीही जेवतो आणि दिवसभराच्या व्यस्त आयुष्यानंतर वेळ मिळेल तेव्हा लोक आंघोळ करतात. पण तुम्हाला माहित आहे का की आपले खाणे-पिणे आणि आंघोळ यांचा थेट संबंध आहे, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

रोज सकाळी उठणे, आंघोळ करणे आणि नंतर जेवल्याने तुमचं मन शुद्ध राहतं आणि कामात करताना प्रसन्न वाटतं. पण त्यामुळे अजून अनेक शारीरिक फायदेही होतात. यामुळे शरीर आतून तंदुरुस्त आणि सक्रिय राहतं. आंघोळीनंतरच खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

आंघोळीनंतर खाण्याचे फायदे:-

  • पचनसंस्था सुधारते-

पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी तुम्ही आंघोळ केल्यानंतरच खा. कारण काहीही खाल्ल्यानंतर तुमचं चयापचय वाढतं आणि तुमच्या पोटाकडे रक्त प्रवाह वाढतो. जेवण झाल्यावर आंघोळ केली तर अचानक शरीराचं तापमान कमी होतं.

त्यामुळे तुमचं पचन मंद होतं आणि पोट खराब होतं. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी दूर ठेवायची असेल तर नेहमी आंघोळीनंतरच खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरात असंतुलन निर्माण होत नाही, उलट तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

Health Tips
Vastu Tips: घरासमोर सांडपाणी असल्यास माता लक्ष्मी होईल नाराज
  • मन उत्साही होतं -

जे लोक सकाळी लवकर उठून दिवसभराच्या कामाला सुरुवात करत नाहीत, त्यांचा संपूर्ण दिवस आळशी आणि तणावपूर्ण असतो. आंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील सर्व शक्ती चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि तुम्हाला आतून ताजंतवानं वाटतं. आंघोळ न करता खाल्ल्याने दिवसभर त्रास होतो. या सर्व कारणांमुळे तुम्ही छोट्या कामातही नाराज होतात आणि राग जास्त येऊ लागतो.

Health Tips
Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यात चाखा 'मूग डाळ समोसा' ची चव

आजारांपासून दूर राहता येतं -

साधारणपणे तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की जेवण्यापूर्वी हात चांगले स्वच्छ धुवावेत जेणेकरून सर्व प्रकारचे जंतू साफ होतात. त्याचप्रमाणे तुम्ही आंघोळ करून खाल्लं तर तुमचं शरीर पूर्णपणे स्वच्छ होतं आणि तुम्ही जरा जास्त जेवता. आंघोळ केल्याने ताजंतवाने आणि उत्साही वाटतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक शांतीही मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com