Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यात चाखा 'मूग डाळ समोसा' ची चव

संध्याकाळच्या नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार करत असाल तर बनवा मूग डाळ समोसा.
Evening Snacks Recipe
Evening Snacks RecipeDainik Gomantak

Moong Daal Samosa Recipe: तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काय बनवायचे हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. काहीतरी गरमा गरम आणि क्रिस्पी खायची इच्छा असेल तर तुम्ही हा टेस्टी मूग डाळ समोसा नक्कीच ट्राय करु शकता. मूग डाळ समोशाची ही रेसिपी खायला खूप चविष्ट असून बनवायला देखील सोपी आहे. जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी मूग डाळ समोसा कसा बनवायचा.

  • मूग डाळ समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

समोशाचा बाहेरील थर तयार करण्यासाठी

- 2 कप मैदा

- 1 चमचा मीठ

- 2 चमचे तेल

- कणिक मळण्यासाठी पाणी

  • फिलिंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य

3 कप धुतलेली मूग डाळ (3-4 तास पाण्यात भिजवून ठेवा)

- 3 टीस्पून गरम मसाला

- 3 टीस्पून लाल तिखट

- 2 टीस्पून बडीशेप पावडर

- 2 टीस्पून धने पावडर

- 1/2 टीस्पून आमचूर पावडर

- 2 टीस्पून तेल

- 1 टीस्पून जिरे

- चीमूटभर हिंग

- चवीनुसार मीठ

Evening Snacks Recipe
Vastu Tips For Savings: कमी इनकममध्ये होईल मोठी सेविंग, आजपासूनच लावा 'या' सवयी
  • मूग डाळ समोसाचे सारण बनवण्यासाठी

मूग डाळ समोसाचे फीलिंग बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ बारीक वाटून घ्यावी. आता एका पॅननध्ये 2 चमचे तेल गरम करा आणि त्यात जिरे आणि हिंग घालावे. तडतडायला लागल्यावर त्यात डाळ घाला आणि बाकीचे साहित्य घालावे. हे मिश्रण मंद आचेवर भाजून घ्यावे. पूर्ण शिजल्यावर ते तव्याला चिकटणार नाही. मिश्रण गॅसवरून काढा आणि थंड होण्यासाठी ठेवावे.

  • मूग डाळ समोसा बनवण्याची कृती

मूग डाळ समोसाचा बाहेरचा थर तयार करण्यासाठी सर्वप्रथम पिठात मीठ आणि तेल घालून कडक पीठ तयार करा आणि पाण्याच्या मदतीने मळून घ्या.

आता ते 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून गोलाकार लाटून अर्धे कापून घ्यावे.

आता एक तुकडा घ्यावा आणि त्याच्या काठावर थोडेसे पाणी लावा आणि त्याचा शंकूच्या आकार करा. वरचा भाग चांगला दाबा आणि फिलिंग भरल्यानंतर बंद करा.

समोसे तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करावे. समोसे तेलात टाकल्यानंतर आच मंद करा आणि सोनेरी होईपर्यंत तळावे.

टोंमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसह आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com