मानसिक आरोग्याबाबत धोका वाढण्याची शक्यता, जाणून घ्या WHOचा अहवाल

चिंता, नैराश्य हे सर्वात सामान्य मानसिक आरोग्याशी संबंधित आजार आहेत जे जगभरात वेगाने पसरत आहेत.
Mental Health
Mental Health Dainik Gomantak
Published on
Updated on

चिंता, नैराश्य हे सर्वात सामान्य मानसिक आरोग्याशी संबंधित आजार आहेत जे जगभरात वेगाने पसरत आहेत. ज्या देशांचे उत्पन्न सामान्य किंवा थोडे कमी आहे अशा देशांतील लोकांमध्ये हा आजार अधिक आहे, परंतु उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणे अधिक नोंदवली जातात.

यामागील कारण म्हणजे विकसित देशांमध्ये या आजाराबाबत अधिक जागरूकता आहे, पण विकसनशील आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांमध्ये तितकी जागरूकता नाही.

Mental Health
गोव्यात मुसळधार सुरुच; जनजीवन विस्कळीत

कोरोनामुळे नैराश्य आणि चिंता आणखी वाढली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आहेत, त्या देशांमध्ये मेंटल हेल्थच्या केसेसमध्ये 1 वर्षात 26 ते 28% अधिक वाढ झाली आहे.

2019 च्या आकडेवारीनुसार, जगभरातील 13% लोक मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. 13% चा हा आकडा सुमारे 1 अब्ज आहे. यापैकी 82% मध्यम किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत जेथे मानसिक आजारांसाठी खूप कमी किंवा खराब आरोग्य सेवा आहेत.

या अहवालानुसार, 50% पेक्षा जास्त महिलांना नैराश्य आणि चिंता असते, तर पुरुषांमध्ये मानसिक विकृतीचे प्रमाण जास्त असते. विकास विकार हा मुलांमधील सर्वात सामान्य मानसिक आजार आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांचाही अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे.

मानसिक आजारांवर $2.5 ट्रिलियन खर्च केले जातात, त्यापैकी सुमारे $1 ट्रिलियन उदासीनता आणि चिंतेवर खर्च केला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, 2030 पर्यंत मानसिक आजारांवर किमान $6 ट्रिलियन खर्च होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com