Vitamin D Health Benefits: शरीराला व्हिटॅमिन डी का गरजेचं? जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे.
Vitamin D Health Benefits
Vitamin D Health BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Vitamin D Health Benefits: निरोगी शरीराला अनेक पोषक आणि जीवनसत्त्वे आवश्यक असतात. त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डी. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. आपल्या शरीराला सर्वात जास्त व्हिटॅमिन डी सूर्याच्या किरणांपासून मिळते.

म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला काही वेळ उन्हात राहण्यास सांगितले जाते. सूर्यकिरण शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. दररोज 20 ते 30 मिनिटे सूर्यकिरणांमध्ये फिरले पाहिजे. सूर्यकिरण हे व्हिटॅमिन डीचे सर्वात महत्वाचे स्त्रोत आहेत. व्हिटॅमिन डीचे आपल्या शरीरला होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घ्या.

Vitamin D Health Benefits
Vastu Tips For Home: घरातील 'या' भिंतीला कधीही नसावा पिवळा रांग; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

1. हाडे मजबूत होतात

मेडिकल न्यूज टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम राखण्यासाठी उपयुक्त आहे.

हे हाडे ठिसूळ, पातळ किंवा फ्रॅक्चर होण्यापासून बचाव करते. सूर्यकिरणांपासूनही ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. म्हणूनच रोज सूर्यकिरणांसमोर बसल्याने शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो.

2. प्रतिकारशक्ती वाढते

शरीरात व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असल्यास टी-सेल्सच्या निर्मितीला गती मिळते. टी-सेल रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारचे बाह्य आक्रमण म्हणजेच विषाणू, बॅक्टेरिया, बुरशी इत्यादींचा संसर्ग hoहोत नाही. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे.

3. तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त

व्हिटॅमिन डी तणाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे नैराश्य कमी करून मूड ठीक करण्याचे काम करते.

4. उच्च रक्तदाब

अनेक अभ्यासांच्या आधारे असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन डीची योग्य मात्रा उच्च रक्तदाबाचा धोका कमी करते. म्हणूनच तुम्ही रोज सूर्यकिरणांसमोर बसले पाहिजे, कारण यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.

व्हिटॅमिन डीचे स्रोत

आपल्या शरीराला सर्वात जास्त व्हिटॅमिन डी सूर्याच्या किरणांपासून मिळते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने 20-30 मिनिटे उन्हात बसावे. याशिवाय कोल्ड लिव्हर ऑइल, सॅल्मन फिश, टूना फिश, ऑरेंज ज्यूस, दुग्धजन्य पदार्थ, अंड्यातील पिवळ बलक, दूध, दही, चीज इत्यादींमध्ये व्हिटॅमिन डी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com