Vastu Tips for Home : घराच्या नैऋत्येला चुकूनही ठेऊ नका या गोष्टी; वास्तुदोषाचा होईल त्रास

Vastu Tips for Home : अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी जड आणि वजनदार वस्तू या दिशेकडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
Vastu Tips For Home
Vastu Tips For HomeDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips for Home : धार्मिक ग्रंथानुसार राहू आणि केतू दक्षिण आणि पश्चिम दिशेला राहतात. त्यामुळे या दिशेचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी जड आणि वजनदार वस्तू या दिशेकडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिशेने बनवण्यास मनाई आहे. वास्तु टिप्सनुसार काही वस्तू नैऋत्य दिशेला ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

प्रत्येक ठिकाणाची आणि प्रत्येक दिशेची स्वतःची वेगळी ऊर्जा असते आणि जर एखाद्या व्यक्तीने त्या दिशेचे महत्त्व समजून त्या दिशेचा वापर केला तर प्रत्येक दिशेतून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जाणून घ्या दक्षिण-पश्चिम दिशेला कोणत्या वस्तू ठेवू नयेत.

(Vastu Tips for Home)

Vastu Tips For Home
Digestion Remedies : जेवल्यानंतर ही फळे अवश्य खा; पोटाशी संबंधित कोणतीही समस्याहोईल दूर

पूजास्थान बनवू नका

वास्तुशास्त्रानुसार पूजास्थान कधीही नैऋत्य दिशेला बनवू नये. या दिशेला पूजास्थान बनवल्याने तुम्हाला पूजा करताना एकाग्र होण्यात अडचण येईल आणि तुमचे मन भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न न राहता इकडे तिकडे भटकेल, त्यामुळे तुम्हाला उपासनेचे फळ मिळणार नाही.

Devghar
Devghar Dainik Gomantak

मुलांची अभ्यासिका बनवू नका

वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासाची खोली कधीही नैऋत्य दिशेला बनवू नये. या दिशेला मुलांसाठी स्टडी रूम बनवल्यास त्यांच्या अभ्यासात अडचणी येतात आणि अभ्यास करूनही त्यांना चांगले परिणाम मिळत नाहीत.

Study Room
Study RoomDainik Gomantak

तुळशीचे रोप लावणे देखील अशुभ मानले जाते

या दिशेला तुळशीचे रोप लावणे देखील अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते, परंतु जर तुम्ही दक्षिण-पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावले तर तुम्हाला तुळशीच्या रोपाची सकारात्मक ऊर्जा मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशीचे रोप लावायचे असेल तर ते ईशान्य दिशेला लावावे.

Tulsi Plant
Tulsi PlantDainik Gomantak

शौचालय बनवू नका

या दिशेला शौचालय बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच या दिशेला बांधलेल्या शौचालयामुळे घरातील प्रमुखाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय त्याला आपल्या जीवनात स्थिरतेचा अभाव जाणवतो आणि मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

Toilet
ToiletDainik Gomantak

अतिथी कक्ष बनवू नका

गेस्ट रूम कधीही नैऋत्य-पश्चिम दिशेला बनवू नका, खरं तर ही दिशा खूप वरचढ मानली जाते. त्यामुळे या ठिकाणी राहणारा पाहुणे स्वत:ला मालक समजतो अन्यथा या दिशेला अतिथी कक्ष बांधून पाहुणे तुमच्याशी अयोग्य वर्तन करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक समस्या येऊ शकतात.

Guest Room
Guest Room Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com