केस चमकदार आणि मजबूत करण्यासाठी करा 'चहा पावडर'चा वापर

खासकरून केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी (Hair Care Tips) चहापावडर अत्यंत लाभदायक ठरते.
Hair Care Tips: Benefits of Tea Powder
Hair Care Tips: Benefits of Tea PowderDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Tea Powder: स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचा आपण सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करू शकतो. त्यापैकीच एक म्हणजे चहापावडर. चहा प्रेमींसाठी चहापावडर हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर चहापावडरचे अनेक गुणकारी फायदे सुद्धा आहेत.

खासकरून केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी (Hair Care Tips) चहापावडर अत्यंत लाभदायक ठरते. आपले केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने चहा पावडरचा उपयोग करू शकतो. (Use Tea Powder to make hair shiny and strong)

Hair Care Tips: Benefits of Tea Powder
मडगावात ई निविदेविनाच कचऱ्याचे कंत्राट

चमकदार केसांसाठी असा बनवा 'हेअर पॅक'

बऱ्याच तरुणींना केसांना मेहंदी लावण्याची सवय असते. पण त्या मेहंदीमध्ये विविध घटक सामील करून त्याचा एक छानसा हेअर पॅक तयार करता येऊ शकतो. ज्यामुळे आपले केस चमकदार आणि मजबूत बनू शकतात. त्यासाठी नेहमी लावणारी मेहंदी (शक्यतो हीना मेहंदी) घेऊन त्यामध्ये चहापावडरचे पाणी घ्यावे. त्यात एलोवेरा जेल आणि आवळा चूर्ण घालावे. हा हेअर पॅक केसांच्या मुळाशी लावून थोडा वेळ मसाज करावा. त्यामुळे केसाच्या मुळांना पोषण मिळून केस मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर उरलेला पॅक केसांना मेहंदी लावतो त्याप्रमाणे लावावा त्यामुळे केसांना एक नैसर्गिक रंग येऊन केस चमकदार होतात.

कोंडा असेल तर असा करा चहापावडरचा उपयोग..

बऱ्याचदा अनेकांना कोंड्याची समस्या हैराण करत असते. अशावेळी चहापावडर यावर गुणकारी ठरू शकते. एक वाटी पाण्यात दोन चमचे चहा पावडर घेऊन ते पाणी उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस पिळून हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावून थोडावेळ मसाज करावे. असे किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावे. यामुळे नक्कीच केसाच्या मुळांशी येणारी खाज आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल.

चहापावडरने केस बनवा मुलायम

एक वाटी चहापावडरच्या पाण्यामध्ये आवळा चूर्ण आणि एलोवेरा जेल घेऊन ती मुळांसकट केसाच्या टोकांपर्यंत लावून अर्धा तास ठेवावे. त्यानंतर शँपूचा वापर न करता कोमट पाण्याने केस धुवावे. असे केल्याने केस चमकदार तर होतीलच त्याचबरोबर केस मऊ आणि मुलायमही बनतील.

हे घरगुती उपाय केसांसाठी लाभदायक आहेत, त्यामुळे हे नक्की करून पहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com