Uric Acid Remedy: 'ही' 5 फळं युरिक अॅसिडमुळे होणाऱ्या वेदनांवर ठेवतात नियंत्रण

Uric Acid Remedy: शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधे कडक होणे, हात-पाय दुखणे, पाय सुजणे, थकवा येणे किंवा टाचांमध्ये वेदना होणे. अशा समस्यांमध्ये काही फळं औषधाप्रमाणे काम करतात.
High Uric Acid
High Uric AcidDainik Gomantak

uric acid remedy these fruits control joint heel pain caused by uric acid

युरिक अॅसिड किंवा संधिवात हा एकेकाळी "राजांचा रोग" म्हणून ओळखला जात असे. कारण श्रीमंत, जास्त वजन असलेल्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात अन्न आणि अल्कोहोल घेणे परवडणारे असे मानले जात असे. पण आता हा आजार कोणत्याही वयात कोणालाही होतो. 


युरिक अॅसिडमुळेच संधिवात होते. जेव्हा तुमच्या रक्तामध्ये युरेट नावाचे रसायन जास्त प्रमाणात असतेतेव्हा संधिरोग होतो. यामुळे तुमच्या सांध्यामध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होऊ लागतात.यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. तुमच्या शरीरात नैसर्गिकरीत्या तसेच काही पदार्थांमध्ये आढळणारे प्युरिन, पदार्थांचे विघटन केल्यावर तुमचे शरीर युरिक ऍसिड तयार करते.


जर तुम्ही जास्त यूरिक ॲसिडमुळे त्रस्त असाल तर काही लिंबूवर्गीय फळे तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. तुम्ही संधिवाताचे रुग्ण असाल तरीही खालील फळे नक्कीच खा.

संत्री

संत्री खाल्ल्याने आपल्या शरीरातील युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित राहते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे ते तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारते आणि युरिक ॲसिडची पातळी देखील नियंत्रित करते. संत्री खाल्ल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. याशिवाय जर युरिक ॲसिड वाढल्यामुळे तुमची टाच दुखत असेल तर संत्री खाल्ल्याने तुमच्या टाचांचे दुखणेही कमी होईल.

अननस

अननस यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. अननसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे फायबर प्युरीन पचण्यास मदत करते. जर तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास होत असेल तर अननसाचे सेवन अवश्य करावे. यामुळे तुमच्या युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

किवी

तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही किवीचे सेवन अवश्य करा. किवीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. किवीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन ई असते जे यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करते.


स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात जे आपले शरीर निरोगी ठेवतात आणि यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूसचेही सेवन करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com