Summer Tips: 'या' सोप्या पद्धतीने घरीच दुरूस्त करा AC, वीज बिलात बचत होईल

Summer Tips: उन्हाळ्यात घरी थंडावा राहावा म्हणून अनेक लोक एसी वापरतात. पण ते घरीच दुरूस्त कसे करायचे हे जाणून घेऊया.
Summer Tips
Summer TipsDainik Gomantak
Published on
Updated on

summer tips easy diy ac maintenance energy bills lower

हिवाळा संपला असून उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक लोक घर थंड राहावे यासाठी एसी वापरतात. पण एसी सुरू करण्यापुर्वी त्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. अनेकांना असे वाटते की त्यांना एसी दुरूस्त करण्यासाठी टेक्नीशियनची गरज असते. परंतु थोडेसे कष्ट आणि योग्य ज्ञान असल्यास हे काम तुम्ही स्वतः करू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरीच कसे एसी दुरूस्त करू शकता.

सर्वात पहिले एसी दुरूस्त करण्यापूर्वी वीज पुरवठा खंडित करवा. यामुळे कोणताही अपघात होणार नाही.

तुमच्या एसीचे बाह्य युनिट पूर्णपणे स्वच्छ करायला विसरू नका. या युनिटवर साचलेली धूळ आणि पडलेल्या पानांमुळे एसीची कूलिंग कमकुवत होऊ शकते. स्वच्छ ब्रश किंवा मऊ कापडाने धूळ काढा आणि अडकलेली पाने देखील काढून टाका.

एसीचे फिल्टर स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. जर फिल्टर घाण झाले तर हवा स्वच्छ राहणार नाही आणि एसी थंड होण्याचे प्रमाण कमी करेल. वेळोवेळी फिल्टर्स स्वच्छ केल्याने हवा चांगली राहते आणि एसीही चांगले काम करतो. यामुळे तुमचा एसी बराच काळ सुरळीत चालू राहतो.

तसेच तुमच्या एसीच्या इनडोअर युनिटच्या आसपासचा भाग स्वच्छ ठेवा. हवेचा प्रवाह होताना अडळा येणार नाही याची काळजी घ्यावी. फर्निचर, पडदे किंवा इतर कोणत्याही वस्तू हवेच्या मधे येऊ देऊ नका. याच्या मदतीने एसी चांगली हवा देऊ शकेल आणि घर लवकर थंड होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com