Relationship Tips: सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी हे '3C' सूत्र नक्की फॉलो करा

तुमचंही लवकरच लग्न होणार असेल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदात घालवायचं असेल, तर या 3C फॉर्म्युल्यांबद्दल नक्की जाणून घेऊया.
Relationship Tips
Relationship TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Relationship Tips long happy successful marriage life

लग्नाच्या 15-20 वर्षांनंतर वेगळे होणारी जोडपी पाहून, लग्न हा योग्य निर्णय आहे की नाही असा प्रश्न अनेक तरूणांच्या मनात येतो. प्रेम, विश्वास आणि गैरसमजाचा अभाव केवळ अरेंज्ड मॅरेजमध्येच दिसत नाही, तर आता प्रेमविवाह करणाऱ्यांनाही या समस्या भेडसावत आहेत. सोबतच जेव्हा अशा जोडप्यांकडे लक्ष जाते जे म्हातारपणातही एकमेकांना प्रेमाने साथ देतात.

सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा कोर्स करण्याची गरज नाही किंवा मोठी पुस्तके वाचण्याची गरज नाही, यासाठी फक्त 3 गोष्टी आवश्यक आहेत. या तीन गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

कमिटमेंट

कमिटमेंटचा अभाव हे नात्यात दूरावा आणि वेगळे होण्याचे प्रमुख कारण आहे. जर तुम्ही कोणाशी लग्न केले असेल आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले असेल तर ते पाळा. तुमची कमिटमेंट दाखवण्यासाठी सोशल मीडियावर शो ऑफ करण्याची गरज नाही, तर तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकात त्याला वेळ देऊन तुमची कमिटमेंट दाखवू शकता.

कम्युनिकेशन

सर्वात पहिले तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जोडप्यांमध्ये भांडणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. परंतु हे भांडण इतके वाढू देऊ नका की ते कुटुंबापर्यंत पोहोचेल आणि काही महिने संवाद थांबेल. कम्युनिकेशन गॅप कोणत्याही नात्यासाठी चांगली नसते. तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदात घालवायचे असेल तर संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती तुमच्या मनात ठेवू नका, तर त्याला सांगा.

कॉम्प्रोमाइज

लग्नानंतर फक्त महिलांनीच प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे अपेक्षित आहे, पुरुषांसाठी ते का आवश्यक नाही? हा प्रश्न समजून घेऊन त्यानुसार जीवनात आवश्यक ते बदल केले तर निम्म्याहून अधिक समस्या इथेच सुटतील. करिअर, कुटुंब, सुख आणि स्वातंत्र्य या सर्वांशी तडजोड करण्याची अपेक्षा फक्त महिलांनी केली, तर नातं नीट चालणार नाही. आवश्यक तेथे काही त्याग करण्याची तयारी ठेवा. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल सकारात्मक भावना राहतात आणि तो नातेसंबंध चांगल्या प्रकारे निभावण्याचा प्रयत्न करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com