Ram Lalla: आज अयोध्येतील राम मंदिरात पंतपप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीराम मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. प्रभू श्रीराम हे एक आदर्श पुत्र, भाऊ आणि पती होते. त्यांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकायला पाहिजेत. एवढेच नाही तर प्रभू रामकडून प्रेरणा घेऊन मनावर नियंत्रण ठेवण्याचे गुण शिकले पाहिजेत. चला रागावर नियंत्रण ठेऊ शकता.
मन शांत ठेवा
देशभरात प्रभू श्रीरामाची मनोभावे पूजा केली जाते. त्यांनी आयुष्यभर अनेक संकटांचा सामना केला. प्रभू श्रीरामाला वनवासात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी नेहमी मन शांत ठेवले.
रागावर नियंत्रण ठेवा
लोकांना अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येतो. पण राग येणे योग्य नाही. प्रभू श्रीरामाने अनेक संकटांचा सामना केला आणि त्यांना कधीही राग आला नाही. तुम्ही प्रभू श्री राम यांच्याकडून शिकले पाहिजे की जीवनातील सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जावे.
निर्णयांवर राहा ठाम
'जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही' या गोष्टींचे प्रभू श्रीरामाने सदैव पालन केले आहे. आपल्या वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले राज्य सोडले आणि वनवास स्वीकारला. माणसाने नेहमी त्याच्या बोलण्यावर ठाम राहिले पाहिजे.
योग्य मार्ग निवडा
प्रभू श्रीरामाने आपल्या जीवनात नेहमीच योग्य मार्ग निवडला. अडचणी असूनही ते योग्य मार्गावर राहिले. माणसाने कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ नये. प्रभू श्रीरामाच्या या सर्व गोष्टी जीवनात अंगीकारून तुम्ही यश मिळवू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.