Petrol Pump Tips:
अनेक वेळा पेट्रोल पंपावर फसवणूक होत असते. पेट्रोल पंपावर काही कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची फसवणूक केल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. उदाहरणार्थ, काहीवेळा लोक जास्त चार्ज करतात आणि काहीवेळा त्यांना कमी पेट्रोल दिले जाते. अनेक वेळा भेसळयुक्त पेट्रोल दिले जाते. जर तुम्हाला पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक टाळायची असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.
मीटरकडे लक्ष द्यावे
पेट्रोल भरतांना मीटरकडे लक्ष द्यावे. मीटरचा काटा शून्यावर असला पाहिजे.
प्रीमियम पेट्रोल भरावे
अनेकवेळा पट्रोल पंपावर तुमच्या परवानगीशिवाय तुमची टाकी अधिक महाग आणि प्रीमियम पेट्रोलने भरू शकतात. पॉवर पेट्रोलमध्ये विशेषतः ऑक्टेन रेटिंग वाढवण्यासाठी ॲडिटीव्ह असतात. याचा गाडीच्या इंजिनवर परिणाम होणार नाही पण तुम्हाला जास्त खर्चात पाडू शकते.
क्वॉटिटि चेक करावी
जर तुम्हाला शंका असेल की तुम्हाला इंधन पुर्ण भरले जात नाही तर तुम्ही तेथील कर्मचाऱ्यांना तपासण्यास सांगू शकता.
योग्य पेट्रोल पंपाचा वापर
शक्य असल्यास योग्य आणि विश्वसनीय पेट्रोल पंपावर इंधन भरावे. तुम्ही नवीन भागात जात असाल तर हे जास्त महत्त्वाचे आहे. चांगल्या व्यवस्थापित कर्मचाऱ्यांसह प्रतिष्ठित पेट्रोल पंपावर फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. तसेच, तुम्ही ऑर्डर करत असलेल्या इंधनाच्या सध्याच्या किमतींबद्दल जागरूक राहा आणि पंप तेच चार्ज करत असल्याची खात्री करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.