Onion-Garlic In Monsoon: पावसाळ्यात अन् श्रावणात कांदा-लसून का खाऊ नये ? जाणून घ्या कारणे

Onion-Garlic In Monsoon: कारण पावसाळ्यात या दोन्ही गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Onion/Garlic
Onion/GarlicDainik Gomantak
Published on
Updated on

Onion-Garlic In Mansoon: पावसाला सुरुवात झाली असून या ऋतुत आपल्यापैकी अनेकांना विविध चवदार पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाहीत. त्यामुळे चमचमीत पदार्थ खमखास खाल्ले जातात.

ज्यामध्ये कांदा-लसनाचादेखील समावेश होतो. पण तुम्हाला माहीत आहे का पावसाळ्यात कांदा लसून खाण्यास मनाई केली जाते. यामागचे कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आणि डेंगू-मलेरियासारखे आजार लवकर होतात. इतर अनेक कारणांसहित आपण घेत असलेला आहार हादेखील कारणीभूत ठरतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि प्रसिद्ध डायटिशन रुजुता दिवेकर यांनी म्हटल्यानुसार, जेव्हा ऋतु बदलतो तेव्हा डाएटदेखील बदलणे आवश्यक आहे.

भारतीय कुटुंबात पावसाळ्यातील 4 महिने कोणत्याही प्रकारचे मांसाहार वर्ज्य करावे असे म्हटले जाते. विशेषतः श्रावण महिन्यात या सर्व गोष्टी खाणे टाळावे. पावसाळ्यात मांस, मासे आणि अंडी खाऊ नयेत. याबरोबरच कांदा लसून खाण्यालादेखील विरोध केला आहे.

Onion/Garlic
Tips For Natural Black Hair: 'या' हिरव्या भाजीच्या मदतीने पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळे

कांदा-लसून का खाऊ नये?

दुसरीकडे, जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी रुजुता दिवेकर यांचा विशेष सल्ला आहे की लसूण-कांदा अजिबात खाऊ नये. कारण पावसाळ्यात या दोन्ही गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पोट गरम होऊ नये आणि पोटात गडबड होऊ नये म्हणून पावसाळ्यात लसून कांदा खाण्यास मनाई केली आहे.

वास्तविक, लसूण आणि कांदा तामसिक आहाराच्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे. कारण ते गरम मानले जाते. असे म्हणतात की या दोन गोष्टी खाल्ल्याने रक्ताभिसरण वर-खाली होते. अशा स्थितीत राग, अहंकार, उत्तेजना, आळस आणि इतर अनेक गोष्टी घडतात. म्हणूनच पूजेत प्रथम लसूण आणि कांदा वर्ज्य आहे.

पावसाळ्यात रताळे खाणे फायदेशीर आहे

रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. यासोबतच यामध्ये फायबरसोबतच लोह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. या ऋतूत गाजर, मका आणि भोपळाही खाऊ शकतो. हे शरीरासाठी खूप चांगले आहे. यामध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com