Most Searched Food in 2023: मिलेट्स ते मोमोज 2023 मध्ये सर्वाधित सर्च पदार्थ, जाणून घ्या

या वर्षात गुगलवर कोणते पदार्थ सर्च करण्यात आले हे जाणून घेऊया.
Most Searched Food in 2023
Most Searched Food in 2023Dainik Gomantak

Most Searched Food in 2023: नवे वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. पण 2023 चा निरोप घेण्यापुर्वी कोणते पदार्थ गुगलवर सर्वाधित सर्च करण्यात आले हे जाणून घेऊया. कोरोनामुळे अनेक लोक आरोग्याबाबत अधिक जागृत झाले आहेत. गुगलने नुकतेच या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश आहे हे जाणून घेऊया.

  • मोमोज

मोमोज हा आज भारतातील सर्वात आवडत्या स्नॅक्सपैकी एक आहे. 2023 मध्ये गुगलवर ट्रेंडमध्ये असलेल्या मोमोजचे कोरियन व्हर्जन खूप सर्च केले गेले.

  • सांबर

सांबर हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या वर्षी सांबरला साईड डिश म्हणून गुगलवर खूप सर्च करण्यात आले.

  • एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच एवोकॅडो खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याचे सेवन नाश्त्यामध्ये केले जाते. एवोकॅडो हे अमेरिकन फळ आहे. 2023 मध्ये एवोकॅडोचा सर्वाधिक सर्च करण्यात आले.

  • काठी रोल्स

फेमस स्ट्रीट फूड काठी रोल देखील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. खाद्यप्रेमींनी या वर्षी गुगलवर काठी रोल खूप सर्च केला आहे. केवळ शाकाहारीच नाही तर मांसाहारींनीही हा पदार्थ गुगलवर सर्च केला आहे.

  • मिलेट्स

गुगलवर 2023 मध्ये सर्वाधित मिलेट्स सर्च करण्यात आले. यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी यासारख्या धान्यांचा समावेश होतो. बाजरीपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com