Mental Health: आजची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. त्याचा आपल्या शारिरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरदेखील मोठा परिणाम होतो. मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे अनेक गोष्टी आहेत.
ज्यामध्ये आपल्या आहाराचादेखील समावेश होतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांसोबत आपल्या आहाराचादेखील परिणाम होतो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होणाऱ्या बाबींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात अशी कोणती लक्षणे आहेत, ज्यामुळे आपल्याला हे समजते की आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जर एखाद्याला डिप्रेशनची समस्या असेल तर त्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. बरेच लोक पोटदुखीला हलकेच घेतात मात्र अशा परिस्थितीत तुम्ही त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुम्हाला कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्य समस्या असल्यास, तुम्ही डोकेदुखीची तक्रार जाणवू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सतत डोकेदुखीची तक्रार असेल, तर समजून घ्या की तुम्ही मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लढत आहात.
छातीत जळजळ किंवा ऍसिडिटी हे देखील नैराश्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील नैराश्याच्या समस्येशी झुंजत असाल तर सावध व्हा कारण छातीत जळजळ हे देखील मानसिक आजाराचे लक्षण आहे.
याबरोबरच, जे नैराश्यात जात आहेत असे लोक बाहेर जाणे कमी करतात. लोकांमध्ये मिसळणे, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, नवीन गोष्टी करणे टाळतात. स्वत:ची काळजी घेणे सोडतात, अस्वच्छ राहायला सुरुवात करतात, आहाराकडे लक्ष देत नाहीत. आजूबाजूला काय चालू आहे त्याबद्दल बेफिकरी बाळगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.