Disc Brake Vs Drum Brake: डिस्क ब्रेक की ड्रम ब्रेक... बाईकसाठी कोणता आहे योग्य? जाणून घ्या

डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक हे दोन पर्याय दुचाकींमध्ये उपलब्ध असतात.
Disc Brake Vs Drum Brake
Disc Brake Vs Drum BrakeDainik Gomantak
Published on
Updated on

Disc Brake Vs Drum Brake: आजकाल प्रत्येकाकडे बाइक आहे. तसेच प्रत्येक घराची गरज बनली आहे. बाइक असो किंवा स्कूटर, रस्त्यावर वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक चांगले असणे गरजेचे आहे. डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक हे दोन पर्याय बाइकमध्ये असतात. डिस्क ब्रेक बाइक ड्रम ब्रेक बाइकपेक्षा महाग आहेत. जाणून घेऊया या दोन ब्रेकमध्ये काय फरक आहे.

दोन प्रकारच्या ब्रेकमध्ये काय फरक ?

डिस्क ब्रेक टायरच्या बाहेर बसवलेले असतात. यामध्ये रोटर आणि कॅलिपर काम करतात. तर, ड्रम ब्रेक आत असतात, ते ड्रम आणि ब्रेक शूसह कार्य करतात. ब्रेक पॅडल दाबल्यावर टायर थांबवण्याचे काम दोघेही करतात. ड्रम ब्रेक त्वरीत जास्त गरम होतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते.

ड्रम ब्रेक आवाज कमी आणि डिस्क ब्रेक वजन

ड्रम ब्रेकमध्ये डिस्क ब्रेकपेक्षा कमी आवाज असतो. डिस्क ब्रेक असलेल्या दुचाकींचे वजन ड्रम ब्रेकच्या तुलनेत कमी असते. ज्यामुळे त्यांना खडबडीत रस्त्यावर हाताळणे सोपं जातं. डिस्क ब्रेक बसवून, दुचाकीचे थांबण्याचे अंतर कमी होते. ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. अचानक ड्रम ब्रेक लावल्यास दुचाकी घसरण्याची भीती असते. डिस्क ब्रेकला गंज लागतो यामुळे त्याची नियमित काळजी घेणे गरजेचे असते.

पावसात डिस्क ब्रेक कार्यक्षम

ड्रम ब्रेक्सचे काळजी घेणे स्वस्त आहे. आपण ते कुठेही सहजपणे दुरुस्त करू शकतो. याच्या तुलनेत डिस्क ब्रेकची काळजी घेणे महाग असते. त्यांची दुरुस्ती करणे अवघड आहे. याशिवाय, ओल्या रस्त्यावर किंवा पावसात ड्रम ब्रेकपेक्षा डिस्क ब्रेक बाइकच्या टायरवर चांगले नियंत्रण ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com