Kitchen Vastu Tips: कोणतीही वस्तू ठेवण्याची योग्य पद्धत आणि दिशा वास्तुशास्त्रात सांगितले आहे. ज्यामुळे वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते. किचनमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती आहे ज्यामुळे घरातील समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि शुभ परिणाम देखील मिळू शकतात. याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
योग्य दिशा कोणती
जर तुम्ही स्वयंपाकघरात भाजीपाला ठेवत असाल तर उत्तर-पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला देवांचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे या दिशेला भाजीपाला ठेवल्यास ही जागा रोज स्वच्छ ठेवावी. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊन अशुभ परिणामही होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींची खास काळजी घ्यावी.
फळं आणि भाजीपाला जमिनीवर ठेवू नका
अनेकदा असे घडते की भाजीपाला घरी आणल्यानंतर त्या जमिनीवर ठेवतात. परंतु असे करणे टाळले पाहिजे. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही टेबलवर भाजीपाला ठेवला पाहिजे. यामुळे नकारात्मकता दूर होऊन घरात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो.
पांढऱ्या पिशवीत भाजीपाला आणावा
भाजीपाला आणण्यासाठी पांढऱ्या पिशवीचा वापर करावा. यामुळे कलह आणि त्रासाची परिस्थिती कमी होते आणि चांगली बातमी देखील मिळते. याशिवाय घरातील रोग आणि दोषांपासूनही आराम मिळू शकतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या पिशवीतच भाजीपाला आणावा.
भाज्या धुवून ठेवल्यास मिळेल लाभ
भाजीपाला आणल्यानंतर त्या न धुताच ठेवल्या जातात. त्यामुळे घरात सुख-शांती येत नाही. यामुळे राहू दोष देखील होऊ शकतो. माता अन्नपूर्णालाही राग येतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही भाज्या विकत घेत असाल तेव्हा स्वच्छ धुऊनच फ्रिजमध्ये ठेवाव्या. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.