How To Be Happy: स्वत:ला आनंदी ठेवू शकत नसाल तर 'या' गोष्टी करतील तुम्हाला मदत

How To Be Happy: तर तुम्ही नैराश्य, मानसिक आजार यासारख्या गोष्टींना बळी पडण्याची शक्यता फार कमी असते.
Happy Life
Happy LifeDainik Gomantak
Published on
Updated on

How To Be Happy: कधी कधी आपल्याला उगाचच दु:खी, उदास वाटायला लागते. आपण अनेकदा इतरांना आनंदी ठेवत असतो मात्र आपल्याला दु:ख होते तेव्हा काय करायचे स्वत:ला आनंदी ठेवायचे ते माहीत नसते.

इतरांबरोबर स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला माहीत असेल स्वत:ला कसे खुश ठेवायचे आहे तर तुम्ही नैराश्य, मानसिक आजार यासारख्या गोष्टींना बळी पडण्याची शक्यता फार कमी असते. चला तर जाणून घेऊयात स्वत:ला आनंदी कसे ठेवू शकतो.

१. स्वत:ला स्विकारा

आपण कसे आहोत, आपला स्वभाव कसा आहे, आपल्याला काय आवडते, आपले छंद काय आहे, तुम्हाला आयुष्या( Life )त काय करायचे आहे, तुमच्या स्वभावात काय दोष आहेत, काय गुण आहेत याची सगळ्यात जास्त माहिती तुम्हाला असते.

इतर कोणाहीपेक्षा तुम्हीच तुम्हाला ओळखत असता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वत:बद्दल सकारात्मक राहा. तुमच्या दिसण्याबद्दल आणि तुमच्या असण्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह राहणे महत्वाचे ठरते. इतर कोणी काही बोलत असेल त्याकडे लक्ष देण्याऐवजी, त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वत:ला विचारा तुम्ही कसे आहात, का आहात आणि तुमच्या वागण्या पाठीमागची कारणे काय आहेत.

स्वत:ला आनंदी ठेवायचे असेल तर स्वत:ला समजून घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे आधी स्वत:ला काय वाटते, एखाद्या घटनेबद्दल तुम्ही काय विचार करता हे जाणून घ्या. स्वत:बरोबर पॉझिटिव्ह बोलण्याची सवय लावा.

२. तुमच्या चांगल्या गोष्टी माहीत करुन घ्या

प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतात. प्रत्येकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट असतात. त्या तुम्ही ओळखून त्यावर काम करणे महत्वाचे असते.

तुम्ही तुमचे चांगले गुण किंवा केलेले काम लिहू शकता. यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यास प्रोत्साहन मिळते.

Happy Life
Etiquette at Work: कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी नाही पाळल्या तर...

३. नवीन अनुभवांसाठी तयार राहा

जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल आणि तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही नवीन अनुभवांसाठी तयार राहा.

४. तुमचे छंद जपा

जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही तुमचे छंद जपणे गरजेचे आहे. कारण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यास तुमचे छंद उपयोगी पडतील.

५. आवडत्या गोष्टी करा

आनंदी राहण्याचा सगळ्यात बेसिक मूलमंत्र म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. आवडते पदार्थ खा, बनवा, आवडत्या व्यक्तींना भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा, आवडत्या

ठिकाणी फिरायला जा, मुक्या प्राण्यांसोबत वेळ घालवा, निसर्गात जा, आवडती गाणी ऐका यामुळे तुम्ही स्वत:ला आनंदी ठेवू शकाल. यामुळे तुम्ही मानसिक आरोग्य(Mental Health ) उत्तम ठेवता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com