Etiquette at Work: कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी नाही पाळल्या तर...

Etiquette at Work: यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
Office
OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Etiquette at Work: आपल्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच नोकरीला लागलेले असतात. अशावेळी बहुतेकजणांना हे माहीत नसते की, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी कसे वागले पाहिजे. एखाद्या चुकीमुळे आपल्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टीकोण बदलू शकतो. त्यामुळे आपण काम करत असल्याच्या ठिकाणी काही नियम पाळणे महत्वाचे ठरते.

1. इतरांप्रति आदर बाळगा

तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, त्याठिकाणी काम करणाऱ्या इतरांप्रति तुम्ही आदर बाळगा. त्यांच्या वेळेचा आदर करा. कोणाच्याही रुममध्ये जाताना त्यांची परवानगी घेऊन आत जा. यामुळे तुम्ही त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करत आहात.

२. वेळ पाळा

आपल्याविषयी इतरांचे चांगले मत तयार करण्यासाठी वेळ पाळणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेत पोहचणे, वेळेत काम पूर्ण करणे, टास्क पूर्ण करणे महत्वाचे आहे.

जर कोणत्या अडचणींमुळे तुम्हाला ऑफीस( Office )मध्ये यायला वेळ लागत असेल तर तुमच्या सहकाऱ्यांना फोन करुन तशी कल्पना द्या. यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

३. मोबाईल बाजूला ठेवा

कामाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवा. सतत मोबाईल( Mobile ) वापरणे, कामाच्या वेळी सोशल मिडियाचा वापर करणे तुमच्याविषयी चुकीचे मत पसरवू शकते.

४. कपडे

ज्यावेळी मिटिंग असेल किंवा इतर वेळी फॉर्मल कपडे घालणे अपेक्षित आहे.

५. संवाद

ऑफीसमध्ये इतर सहकाऱ्यांबरोबर संवाद साधणे महत्वाचे ठरते. यामुळे इतरांबरोबर तुमची बॉडिंग तयार होते. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.

Office
Happy Relationship Tips: जोडीदार निवडताना 'ही' गोष्ट तपासणे महत्वाचेच

६. मध्येमध्ये बोलणे टाळा

जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर मध्येमध्ये बोलू नका. त्यांचे बोलणे पूर्ण होऊ द्या. त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांना थांबवू नका. यामुळे तुम्ही त्यांचा आदर ठेऊ शकाल.

७. मिटिंगमध्ये सहभागी व्हा

ऑफीसमध्ये जेव्हा मिटिंग होत असेल तेव्हा तुम्ही सहभागी होणे, तुमचे मत मांडणे, गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com