Home Cleaning Hacks: 'या' 5 पद्धतीने घराची स्वच्छता करणे होईल सोपी

तुम्हाला घर स्वच्छ करण्यासाठी पुढील सिंपल हॅक मदत करतील.
Cleaning Hacks
Cleaning HacksDainik Gomantak
Published on
Updated on

Home Cleaning Hacks: घराची स्वच्छता नीट केली नाही तर काही मिनिटांतच तुमचे घर अस्वच्छ होऊ शकते. अनेक वेळा आपल्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे आपले घर अस्वच्छ दिसते. घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पुढील काही सोप्या हॅकची मदत घेऊ शकता.

  • सकाळी उठल्याबरोबर बेड स्वच्छ करा

अनेकजण सकाळची सुरुवात आळस देऊन करतात. असे करणे चुकीचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ताबडतोब तुमचा बेड स्वच्छ केला पाहिजे. यामुळे तुमचे काम सोपे होईल.

  • गरजेच्या वस्तू ठेवणे

जर तुम्ही एकटे राहत असाल, बॅचलर असाल तर तुम्हाला तुमच्या घरात जास्त सामान ठेवण्याची गरज नाही. अनेक वेळा जादा सामानामुळे घराची साफसफाई करण्यात अडचण येते, कमी सामान असेल तर स्वच्छ करणे सोपे जाते.

  • बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवणे टाळा

जेवण केल्यानंतर बेसिनमध्ये असलेली भांडी ताबडतोब स्वच्छ करावीत. अन्यथा तुमच्या कामात फारशी प्रगती होणार नाही. आळशीपणामुळे बरेच लोक भांडी गोळा करून ठेवतात आणि नंतर ती स्वच्छ करणे कठीण होते.

  • आठवड्यातून दोन दिवस स्वच्छता

तुम्ही आठवड्यातून दोन दिवस घराची स्वच्छता केली पाहिजे. यामुळे तुम्हाला जास्त कामही लागणार नाही आणि तुमचे घरही स्वच्छ आणि नीटनेटके होईल.

  • व्हॅक्यूम क्लिनरचा वापर

हिवाळ्याच्या दिवसात थंडीमुळे काम करताना खूप आळस येतो. जर तुमचे घर मोठे असेल तर व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने घर स्वच्छ करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com