निसर्गाच्या कुशीत वसलेला गोवा

गोव्याला जसा आकर्षक समुद्र किनारा (Beach) लाभलेला आहे त्याचप्रमाणे घनदाट आणि ऐश्वर्यसंपन्न जंगलही (Forest) दुसऱ्या बाजूला लाभलेले आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेला गोवा
निसर्गाच्या कुशीत वसलेला गोवा Dainik Gomantak
Published on
Updated on

गजानन शेट्ये हे 'मृगया एक्सपेडिशनसाठी' नॅचरलिस्ट म्हणून काम करतात. 'मृगया एक्सपेडिशन' निसर्ग निरीक्षणासाठी गोव्यात (Goa) आणि आंबोली परिसरात ट्रेक आयोजित करते. गोव्यात (Goa) पर्यटक (Tourist) यायला सुरुवात झालेली आहे. पक्षी किंवा वन्यजीव संपदेत रस असणार्‍या पर्यटकांना (Tourist) घेऊन शेट्ये यांची भ्रमंती सुरू झालेली आहे. आपल्याला हवा असलेला पक्षी (Birds) दाखवण्यात त्यांची ख्याती आहे. त्यांचे पक्ष्यांबद्दलचे ज्ञान आणि त्यांचा ‘बर्डकॉल’ (Birdcall) ह्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत.

गोवा (Goa) म्हटल्यावर आपल्याला ‘सी, सन अँड सॅण्ड’ या शब्दांची आठवण येते. पण गोव्याला जसा आकर्षक समुद्र किनारा (Beach) लाभलेला आहे त्याचप्रमाणे घनदाट आणि ऐश्वर्यसंपन्न जंगलही (Forest) दुसऱ्या बाजूला लाभलेले आहे. तुलनेने अगदी छोटे राज्य असले तरी भरपूर पाणथळ जागा, तळी, समृद्ध पठारे, जंगले आणि समुद्रकिनारे या साऱ्यांमुळे दैवदुर्लभ अशी जैवसंपदा गोव्याला (Goa) लाभलेली आहे. पर्यटक (Tourist) जसे गोव्यात समुद्रस्नान घ्यायला किंवा चर्च-देवळे वगैरे पाहायला येतात तसेच ते या जैवसंपदेच्या आकर्षणानेही येतात. पक्षी, जंगली श्वापदे, सर्पकुळे यांचेही आकर्षण अनेक पर्यटकाना असते. म्हादईचे खोरे, भगवान महावीर नॅशनल पार्क, महावीर अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य, खोतीगाव हे जंगलाने वेढलेले पाच पट्टे पश्चिम घाटाकडे जुळलेले आहेत. या पट्ट्यामधून वसलेले काही पक्षी आणि प्राणी सहसा दुसरीकडे आढळत नाहीत त्यामुळे त्यांच्या निरीक्षणासाठी पर्यटक (Tourist) या भागात सतत येतात.

निसर्गाच्या कुशीत वसलेला गोवा
Goa Trip: या Goan Food चा आस्वाद नक्की घ्या

कोरोनाकाळापूर्वी (Corona) गोव्यात (Goa) जैवसंपदेचे निरीक्षण करण्यास आलेल्या पर्यटकांपैकी बहुतांश पर्यटक परदेशी असायचे. परदेशी पर्यटक (Tourist) आणि देशी पर्यटक यामधला महत्त्वाचा फरक सांगताना शेट्ये म्हणतात की परदेशी पर्यटक हा अभ्यास करून येतो. ‘फक्त निरीक्षण’ हेच त्यापैकी बहुतेकांचे उद्दिष्ट असते. जे आपल्याला पाहायचे आहे त्याची यादी करून ते येतात. प्राणी-पक्षी यांच्या निरिक्षणासाठी ते स्वतःची साधने, उदाहरणार्थ दुर्बिणी वगैरे घेऊन येतात. देशी पर्यटकांना फोटोग्राफी(Photography) करण्यात अधिक रस असतो. त्यांच्याकडे कॅमेरा (Camera) हे एकच साधन मुख्यत्वेकरून असते.

कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन मोसमात परदेशी पर्यटकांच्या (Tourist) संख्येत बरीच घट झालेली आहे. कोरोनापूर्वकाळात वर्षाला साधारण तीनशे ते चारशे परदेशी पर्यटक (Tourist) इथल्या जैवसंपदाचे निरीक्षण आणि अभ्यास करायला यायचे. स्थलांतरित पक्षी, स्थानिक पक्षी, फुलपाखरे, श्वापदे, साप ही गोव्यात (Goa) सारीकडे आढळणारी जैवसंपदा आहे. मात्र समुद्रकिनाऱ्यावरचे स्थलांतरित पक्षी हे किनार्‍याच्या आसपासच आढळतील. उडणारे साप किंवा ‘स्लेंडर लोरीस’ पश्चिम घाटातल्या जंगल परिसरातच दिसतील. पाणथळ जागा किंवा तळी यांच्या आश्रयाला असलेले पक्षीही विशिष्ट असतील.

फुलपाखरे (Butterfly) देखील विशिष्ट क्षेत्रातच आढळतात. अशाप्रकारचे गोव्याच्या हर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जैवसंपदा विखरून आहे. 'मृगया एक्सपेडिशन' या साऱ्या जागांवर आपले टूर आयोजित करते. त्यांचे दोन किंवा तीन रात्रीचे पॅकेज असलेल्या या टूरमध्ये समुद्रसफारीचाही अंतर्भाव असतो. त्यांचे असे निरीक्षण आहे की अलीकडच्या काळात गोमंतकीय, विशेषतः युवा वर्गांचे आपल्या जैवसंपदेकडे आकर्षण वाढू लागले आहे आणि गोमंतकीयांची संख्यादेखील निरीक्षक म्हणून वाढते आहे. गोवा (Goa) हे जैवसंपदाच्या दृष्टीने श्रीमंत असले तरी हल्लीच्या काळात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे ही संपदा काही ठिकाणी क्षीण होत चालली आहे. हे सांगताना ते करमाळीच्या तळ्याचे उदाहरण देतात. करमळीचे तळे एकेकाळी पक्ष्यानी गजबजून असायचे मात्र नंतर तिथे आलेल्या रेल्वेट्रॅकमुळे (Railway Track) आणि तिथल्या बांधकामांमुळे करमळीतल्या तळ्यामधल्या पक्ष्यांची संख्या आता बरीच रोडावली आहे.

शेट्ये यांच्या म्हणण्याप्रमाणे पर्यटन (Tourism) क्षेत्रात आज असलेल्या आकर्षणाच्या अनेक क्षेत्रांपैकी बहुतेक क्षेत्रे ही गोव्याचा (Goa) निसर्गाचा भाग आहे हे गोव्याचे भाग्य आहे. समुद्र ते जंगल अशाप्रकारची नैसर्गिक बहुविधता गोव्याला लाभणे एक दैवी कृपा आहे. ह्या दैवदत्त कृपेचा प्रसाद आपण अशा जाग्यांवर सैर करून आणि तिथल्या निसर्गाच्या हाका ऐकतच स्विकारला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com