Diwali Party: हिंदु धर्मात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशा लोक घरे सजवतात, मिठाई बनवतात, फटाके फोडतात,एकमेकांना शुभेच्छा देतात. पण सध्या दिवाळीत डिनर पार्टी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या पार्टीमध्ये बटाटा-पुरी, चणे, पनीर, गुलाब जामुन यासारख्या अनेक गोष्टींचा आस्वाद घेतला जातो.
तुम्ही डिनरसाठी साइड डिश म्हणून पुढील पदार्थांचा समावेश करू शकता.
व्हेजिटेबल कबाब
आता भाज्या किंवा इतर शाकाहारी पदार्थांपासून बनवलेले कबाबही बाजारात उपलब्ध आहेत. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी सोयाबीनपासून बनवलेल्या गोष्टी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही मटार आणि सोयाबीनचे हिरवे कबाब बनवू शकता. डिनर पार्टीमध्ये पाहुण्यांना व्हेज कबाबची चव नक्की आवडेल.
पनीर टिक्का
पनीर टिक्का शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम स्टार्टर आहे. त्याची चव देखील अप्रतिम असते. लहान मुल देखाल मोठ्या आवडीने खातात. तुम्ही पाहुण्यांसाठी घरी सहज तयार करू शकता.
स्वीट कॉर्न चाट
हा एक निरोगी आणि चविष्ट नाश्ता आहे. हा पदार्थ मुले आणि वृद्ध दोघेही खाऊ शकतात. विशेष म्हणजे मधुमेही देखील या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. शाकाहारी लोकांना दिवाळीत काही खास खायचे असेल तर ते भाज्यांसोबत बनवलेले स्वीट कॉर्न चाट खाऊ शकतात.
जामुन मोजिटो
पेयांमध्ये तुम्ही जामुन मोजिटो बनवू शकता. हे ब्लॅकबेरी ज्युस, लिंबू, काळे मीठ आणि सोडा मिक्स करून बनवले जाते. यामध्ये बर्फाचा वापर तुमच्या आवडीवर आहे. पण या अनोख्या पेयाने सेलिब्रेशनची मजा द्विगुणित करता येते.
खीर
गुलाब जामुन, रसगुल्ला किंवा इतर मिठाईंमध्ये साखरेचा प्रमाण जास्त असतो. जर तुम्ही मिठाईमध्ये काही आरोग्यदायी पर्याय शोधत असाल तर तुम्ही तांदळापासून बनवलेली खीर निवडू शकता. घरी बनवत असल्याने तुम्ही कमी साखर घालु शकता. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ तुमच्या दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणित करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.