Diabetes Care: शुगरच्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. शुगरच्या रुग्णांसाठी कोणताही गोड पदार्थ विषासमान असतो. गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते.
पण एक असे गोड फळ आहे जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेउ शकते. रताळे खायला गोड लागतात पण त्याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो. चला तर मग जाणून घेऊया रताळे खाण्याचे आणखी फायदे कोणते आहेत.
शुगर असलेल्या लोकांसाठी फायदेशीर
रताळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने शरीर उबदार राहते. हे एक कंदमुळ असून चवीला गोड आहे पण शुगर असलेले लोक हे खाऊ शकतात. रताळ्यामुळे उच्च ग्लुकोजची पातळी कमी होते. शुगरच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. शुगरचे रुग्ण याची साल काढून खाऊ शकतात.
रताळे खाण्याचे इतर फायदे
पचनासाठी फायदेशीर
रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण खुप असते. त्यामुळे ते पचनासाठी चांगले असते. रताळे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. अॅसिडीटी, पोट फुगणे आणि पचनसंस्था खराब होणे यासारख्या पोटाच्या इतर समस्यांवरही रताळे खाणे फायदेशीर आहे.
रताळे तळून खाणे टाळावे
रताळे खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे चांगले असते. पण रताळे कधीच तळून खाऊ नका. कारण ते खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. फक्त उकडलेले रताळे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात.
वजन कमी करते
रताळ्यामध्ये पौष्टिक पदार्थांचा चांगला स्त्रोत मानला जातो. शगरच्या रूग्णांसाठी फायदेशीर असण्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर रताळ्याचा आहारात समावेश करावा.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर आहे. रताळे खाल्ल्याने शरीराला अँटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी मिळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मौसमी आजार दूर राहतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.